Monday, June 21, 2021
Homeपिंपरी-चिंचवडपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक

पिंपरी चिंचवड, 9 जून: (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयात (Pimpri Chinchwad Municipal Corporation Hospital) आज ऑक्सिजन गळती (Oxygen leak) झाल्याची घटना घडली आहे. महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या 10 टन टँकचा सेफ्टी वॉल लिकेज (Oxygen tank safety tank leak) झाल्याने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन गळती झाली. सुदैवाने रुग्णालय प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली त्यामुळे नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती टळली आहे.

(राज्याला दिली २३ हजार इंजेक्शन्स; केंद्राची माहिती)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या टँकमध्ये ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम सुरू होते. त्याच दरम्यान प्रेशर जास्त झाल्याने टाकीचा सेफ्टी वॉल लिक झाला आणि मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन गळती सुरू झाली. सुदैवाने अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.

पुण्यातून आनंदाची बातमी! कोविड रुग्णांमध्ये विक्रमी घट, 50 दिवसांत 53 हजार रुग्ण कोरोनामुक्त

मनपाच्या या वायसीएम रुग्णालयात एकूण 800 बेड्स आहेत. सध्यस्थितीत रुग्णालयात एकूण 406 कोविड बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ऑक्सिजन लीक झाल्यानंतर रुग्णालयातील रुग्णांवर त्याचा काय परिणाम झाला का? या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाहीये. या प्रकरणी मनपा आयुक्त राजेश पाटील, वैद्यकीय विभाग प्रमुख यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाहीये.

(मुंबई तुंबताच अमृता फडणवीसांची शायरी, शिवसेनेला टोमणा देत म्हणाल्या…)

नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती टळली

काही दिवसांपूर्वी नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात सुद्धा अशाच प्रकारे ऑक्सिजन टँक लीक झाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत रुग्णालयातील 22 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत त्यानंतर शासनाने जाहीर केली होती.


Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW