पंकजा मुंडें छत्रपती संभाजीराजेंची सदिच्छा भेट..

0
32

बीड – खासदार छत्रपती संभाजीराजे यांचं आज बीडमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. मराठा आरक्षण जनसंवाद दौऱ्यासाठी छत्रपती संभाजीराजे 2 दिवसांसाठी बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. काही वेळापूर्वी ते बीड शहरात दाखल झाले असून यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांची सदिच्छ भेट घेत सत्कार केला. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेची देखील उपस्थिती होती. Pankaja Munde Meets Sambhaji Raje

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन संभाजी राजे राज्यभरात दौरे काढून मराठा समाज बांधवांशी संवाद साधत आहेत. आज ते बीडच्या दौऱ्यावर आले आहेत. बीड शहरातील शासकीय विश्रामगृहात संभाजीराजे आले असता पंकजा मुंडे यांच्याकडून त्यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. मराठा आरक्षण जनसंवाद यात्रेसाठी संभाजीराजे बीडमध्ये आले आहेत. एकीकडे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला रुप्रिम कोर्टाने रद्द ठरले आहे तर काळ मराठा समाज आरक्षण संदर्भातील पुनर्विचार याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.

या दरम्यान झालेल्या या भेटीला महत्व आहे. ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाकडून आंदोलन केले जात आहे. पंकजा मुंडे त्याचं नेतृत्व करत आहेत. तर दुसरीकडे मराठा आरक्षण चळवळीला घेऊन छत्रपती संभाजीराजे आक्रमक आहेत. आजच्या भेटीचा योगा योग असला तरी दोन्ही नेत्यात बराच वेळ चर्चा झाल्यानं, ही चर्चा नेमकं कशावर झाली ? याविषयी जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.