Tuesday, July 27, 2021
Homeक्रीडाPetrol Diesel Price Hike Petrol By 33 Paise And Diesel By 37...

Petrol Diesel Price Hike Petrol By 33 Paise And Diesel By 37 Paise In Mumbai


मुंबई :  शुक्रवारी एका दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर आता शनिवारी पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पहायला मिळालं आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात 33 पैशांनी तर डिझेलच्या दरात 37 पैशांची वाढ झाली आहे. दिल्लीतही पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रत्येकी 35 पैशांची वाढ झाल्याचं दिसून येतंय. 

देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किंमती

शहर             पेट्रोल        डिझेल
मुंबई            104.22      96.16
दिल्ली           98.11        88.65
चेन्नई            99.18       93.22
कोलकाता      97.99      91.49

महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाच्या किंमतीत घट होत असताना भारतात मात्र इंधनाच्या दरात वाढ होत आहे. 

देशात 15 जून  2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx  पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

महत्वाच्या बातम्या : Source link

Petrol Diesel Price Hike Petrol By 33 Paise And Diesel By 37 Paise In Mumbai
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News