Thursday, July 29, 2021
Homeक्रीडाPhoto : मिताली राजने रचला इतिहास, सचिन तेंडुलकरच्या पंगतीत मिळवलं स्थान, अशी...

Photo : मिताली राजने रचला इतिहास, सचिन तेंडुलकरच्या पंगतीत मिळवलं स्थान, अशी कामगिरी करणारी पहिलीच महिला | Inidan Women Cricketer Mithali Raj Became First Female Indian to complete 22 Years in International Cricket after Great Sachin Tendulkar



भारताची महिला क्रिकेटपटू मिताली राज हिने एक नव्या यशाचं शिखर गाठलं असून तिने थेट महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या पंगतीत यामुळे स्थान मिळवलं आहे.

1/4

mithali raj

भारताची सर्वात दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राजने (Mithali Raj) आज (26 जून) आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची 22 वर्षे पूर्ण केली आहेत. इतक्या दिर्घकाळ खेळणारा दुसरा भारतीय खेळाडू म्हणजे महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar). सचिन 22 वर्षे 91 दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला असून मितालीने आज 22 वर्षे पूर्ण केली आहेत.(Inidan Women Cricketer Mithali Raj Became First Female Indian to complete 22 Years in international Cricket)

2/4

mit raj

मितालीने आजच्याच दिवशी म्हणजे 26 जून, 1999 रोजी आयर्लंड विरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत तिने भारतीय महिला क्रिकेट संघाकडूनअप्रतिम कामगिरी केली आहे.

3/4

mitali rajj

मितालीने काही महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. तिने 75 अर्धशतकांसह 8 शतकही ठोकली आहेत.

4/4

mitali sachin

मितालीने 22 वर्षे पूर्ण केली असून ती अजूनही भारताकडून खेळत आहे. तर दुसरीकडे सचिनने 22 वर्षे 91 दिवस खेळल्यानंतर 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सचिनने 18 डिसेंबर 1989 रोजी पाकिस्तान विरुद्ध पहिली वनडे खेळली होती. त्यानंतर 18 मार्च, 2012 रोजी पाकिस्तान विरोधातच शेवटची वनडे देखील खेळली.



Source link

Photo : मिताली राजने रचला इतिहास, सचिन तेंडुलकरच्या पंगतीत मिळवलं स्थान, अशी कामगिरी करणारी पहिलीच महिला | Inidan Women Cricketer Mithali Raj Became First Female Indian to complete 22 Years in International Cricket after Great Sachin Tendulkar
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News