पिंपरी (संपादक: सोमनाथ देवकाते) | शासननामा न्यूज ऑनलाईन
भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दिर्घ आजारामुळे आज मंगळवारी सकाळी रुग्णालयात निधन झाले आहे.
चिंचवड मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप हे अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. अश्यातच पुन्हा त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
आज मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. जगताप यांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवड शहरात तसेच चिंचवड मतदार संघात शोककळा पसरली आहे.