Home पिंपरी-चिंचवड PCMC: महापालिकेच्या 40 कनिष्ठ अभियंत्यांना बीट निरीक्षकांचीही कामे करावी लागणार

PCMC: महापालिकेच्या 40 कनिष्ठ अभियंत्यांना बीट निरीक्षकांचीही कामे करावी लागणार

0
PCMC: महापालिकेच्या 40 कनिष्ठ अभियंत्यांना बीट निरीक्षकांचीही कामे करावी लागणार

चिंचवड महापालिकेच्या(PCMC) अनधिकृत बांधकामांवर अधिक कार्यक्षमतेने कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या 40 कनिष्ठ अभियंत्यांनी बीट निरीक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या अतिरिक्त पदाचे कामकाज करावे लागणार आहे. याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी काढला आहे.

शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई अधिक कार्यक्षमतेने तसेच प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीने पालिकेच्या 8 क्षेत्रिय कार्यालयाच्या स्तरावर अनधिकृत बांधकामावर बीट निरीक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांच्यामार्फत कारवाई करण्यात येते.

मात्र, महापालिकेच्या आस्थापनेवरील बीट निरीक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांना कनिष्ठ अभियंता पदावर पदोन्नती विविध क्षेत्रीय कार्यालयात पदस्थापना देण्यात आली आहे. यामध्ये 8 क्षेत्रीय कार्यालयातील बीट निरीक्षकांचा समावेश आहे.

त्यामुळे क्षेत्रिय कार्यालय स्तरावरील अनधिकृत बांधकामावर प्रभावी कारवाई करताना अडथळा निर्माण झालेला आहे. त्यामुळे कनिष्ठ अभियंता पदावर पदोत्रती देण्यात आलेल्या 40 कनिष्ठ अभियंत्यांनी बीट निरीक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी (PCMC) सहाय्यक पदाचा अतिरिक्त कामकाज सोपविण्यात आल्याचे आयुक्त सिंह यांनी आदेशात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here