Home महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र 30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career

30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career

0
30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं | Career

पुणे, 16 जून: माणूस कितीही शिकला तरी तो आयुष्यभर विद्यार्थीचं असतो. तो आपल्या आयुष्यात घडणाऱ्या विविध अनुभवातून शिकत पुढे जात असतो. पण शिक्षणाची प्रचंड गोडी असलेल्या पुण्यातील एका महिलेनं 30 वर्षे बँकेत नोकरी केल्यानंतर पुन्हा शिक्षणाची कास धरली आहे. साहित्य आणि लेखणाची आवड असणाऱ्या या 56 वर्षीय विद्यार्थीनीनं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (SPPU) चार सुवर्ण पदकं (4 Gold medals) मिळवली आहेत. त्यामुळे पुण्यातील नीलिमा फाटक (Neelima Phatak) यांच्या जिद्दीचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.

खरंतर माणूस वयाच्या तिशीपर्यंत शिक्षण घेतो. त्यानंतर नोकरी किंवा व्यवसाय करून आरामदायी आयुष्याकडे वळतो. पण पुण्यातील नीलिमा फाटक यांनी 30 वर्षे बँकेत नोकरी केल्यानंतर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम ए मराठीला प्रवेश घेतला. एवढंच नव्हे तर, शिक्षणात एवढा मोठा खंड पडूनही त्यांनी चार सुवर्ण पदकं पटकावली आहेत. फाटक यांनी कॉमर्समध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर वकिलीचं शिक्षणही घेतलं आहे. पण त्यांच्यातील काव्यलेखन आणि साहित्य वाचणाची आवड त्यांना शांत बसू देत नव्हती.

बँकेत रुजू झाल्यानंतर, त्यांनी 30 वर्षे नोकरी देखील केली. दरम्यानच्या काळात त्यांनी आपलं लेखनही सुरू ठेवलं. 2019 मध्ये त्यांचा ‘नीलमाधव’ नावाचा काव्यसंग्रह देखील प्रकाशित झाला होता. नीलिमा फाटक सध्या स्नेहवन नावाच्या संस्थेशी सलग्न असून ही संस्था आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या संगोपणाचं काम करते.

मॉरिशसमधील पाठ्यपुस्तकात फाटक यांच्या कवितेचा समावेश

खरंतर, त्यांनी केवळ चार सुवर्ण पदकंचं पटकावली नाहीत. तर त्यांच्या एका कवितेचा मॉरिशसमधील अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. बँकेत तीस वर्षे नोकरी केल्यानंतर 54 व्या वर्षी फाटक यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम ए ला प्रवेश घेतला होता. त्यांच्या एका कवितेचा मॉरिशसमधील इयत्ता नववीच्या पुस्तकात अभ्यासक्रम म्हणून समावेश करण्यात आला आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here