Chinchwad Election 2023 : जोरदार शक्तीप्रदर्शन करत अश्विनी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
116

पिंपरी-चिंचवड (रमेश विरनक) शासननामा न्यूज ऑनलाईन

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम युतीच्या (Chinchwad Election 2023) उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप (Ashwini Laxman Jagtap) यांनी आज (सोमवारी) जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

थेरगाव येथील निवडणूक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, माजी महापौर उषा ढोरे, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्यासह माजी नगरसेवक, पक्षाचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील जनसंपर्क कार्यालयापासून सकाळी 9 वाजता पदयात्रेला सुरूवात झाली. गावातील भैरवनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सृष्टी चौक, सुदर्शननगर, जवळकरनगर, कल्पतरू फेज 1, सुदर्शन चौक, स्वराज गार्डनमार्गे पिंपळेसौदागर गावठाण पुढे शंकर मंदिर, रहाटणी चौक, विमल गार्डन, बळीराज गार्डन, कुणाल गार्डन, (Chinchwad Election) बापुजी बुवा मंदिर, थेरगाव हॉस्पिटलमार्गे ग प्रभाग कार्यालयापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली.