मुंबई, 12 जून: मागील दीड वर्षांपासून देशात लॉकडाऊन (Lockdown) जारी करण्यात आलं आहे. दरम्यानच्या काळात अनेकांना ‘वर्क फ्रॉम होम’चा (Work From Home) अवलंब करावा लागला आहे. परिणामी 24 तास पती-पत्नी घरातच असल्याने त्यांच्यात अनेकदा खटके (Husband Wife Hassle) उडत आहेत. दरम्यान कौटुंबीक हिंसाचारात मोठ्या प्रमाणात वाढ (Increase domestic violence case) झाली आहे. पण लॉकडाऊनच्या काळात पत्नींच्या तुलनेत पतीवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाल्याचा (crime against men during lockdown) धक्कादायक खुलासा पुणे पोलिसांच्या ‘ट्रस्ट सेल’ने केला आहे.
ट्रस्ट सेलच्या प्रमुख सुजाता शानमे यांनी सांगितलं की, मागील दीड वर्षात तीन हजाराहून अधिक घरगुती वादाच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील बहुतांशी प्रकरणं मारहाण, शारीरिक आणि मानसिक छळाची आहेत. काही तक्रारींमध्ये असाही दावा केला आहे की, भांडण झाल्यानंतर त्यांच्या बायका मुलांना घेऊन माहेरी गेल्या आहेत. त्या अद्याप परत आल्या नाहीत, त्यामुळे पुरुषांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
सुजाता शानमे यांनी पुढं सांगितलं की, 24 तास बंद खोलीत एकटं राहिल्यामुळे नवरा बायकोंमधील मानसिक तणाव वाढत गेला आहे. छोट्या छोट्या कारणांवरून पती-पत्नीमध्ये भांडण होत आहेत. अशा लोकांना कॉलवरून किंवा ऑनलाईन माध्यमातून समुपदेशन करून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागील दीड वर्षात स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या छळ झाल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे.