Home पिंपरी-चिंचवड Dighi ; हिंदू नववर्ष व गुडीपाडव्याच्या स्वागतानिमित्त दिघी येथे भव्य मोटारसायकल शोभायात्रा

Dighi ; हिंदू नववर्ष व गुडीपाडव्याच्या स्वागतानिमित्त दिघी येथे भव्य मोटारसायकल शोभायात्रा

0
Dighi ; हिंदू नववर्ष व गुडीपाडव्याच्या स्वागतानिमित्त दिघी येथे भव्य मोटारसायकल शोभायात्रा

दिघी (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त दिघीगाव व उपनगर यांच्या वतीने भव्य दुचाकीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती.

हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेल्या या भव्य शोभायात्रेत हजारो दुचाकी वाहनांवरून हिंदू बांधव, महिला व अबाल वृद्ध सहभागी झाले होते.


विठ्ठल मंदिर येथून रॅली सुरू होउन सुमन शिलतेज – दिघी आळंदी रोड मार्गे बी यु भंडारी येथून आदर्श नगर – सावंतनगर कमानी समोरून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे पुष्पहार अर्पण करून सुधामा भेळ व स्टार गॅरेज येथून गायकवाड नगर – रूनवल पार्क – विजय नगर – चौधरी पार्क गल्ली नं. 6 येथून मराठी शाळा – जकात नाका मार्गे विठ्ठल मंदिर येथे रॅलीचा समारोप झाला. तब्बल 3 तास अतिशय शिस्तबद्धपणे ही शोभायात्रा सुरू होती. शोभायात्रेमध्ये सहभागी दुचाकी वाहनांमुळे तब्बल पाच किमी अंतराचा मार्ग व्यापला गेला होता.

पिंपरी चिंचवड शहरात निघणारी ही सर्वात मोठी दुचाकी शोभायात्रा होती. विशेष म्हणजे या दिघीगाव उत्सव समितीला कोणीही पदाधिकारी नसतात. सर्वच स्तरांतील मंडळी स्वंयस्फूर्तीने या रॅलीचे नियोजन करतात.

रॅलीमधील महिला व युवकांचा नेहमीप्रमाणे यावर्षी उत्साह वाखणण्याजोगा होता.

विठ्ठल मंदिर येथे दिघीतील सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून रॅलीला सुरुवात झाली त्यामागे महिला, युवक व पुरुष रॅलीमध्ये भारतमाता व छत्रपती शिवराय यांच्या घोषणा प्रत्येक वाहनांना हिंदू ध्वज, सहभागी प्रत्येक महिलांच्या डोक्यावर भगवा फेटा व पुरुषांना भगवी टोपी अशा या अभूतपूर्व रॅलीमुळे दिघी परिसर भगवामय झाला होता. जागोजागी नागरिकांनी रॅलीवर फुलांची उधळण व फटाक्यांची आतीषबाजी केली, काही ठिकाणी नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.

चैत्र पाडव्याच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी लंकेवर विजय मिळवून ते आयोद्धेत दाखल झाले. तेव्हापासून तमाम हिंदू बांधव हा दिवस घरावर गुढ्या उभारून विजयदिन म्हणून साजरा करतात. तसेच गुढी पाडव्याच्या दिवशी संवत्सर बदलते व हिंदू नववर्षाची सुरुवात होते. म्हणून हा दिवस दिघीगावाच्या उत्सव समितीच्या वतीने मोठया उत्साहात साजरा केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here