
पुणे (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन
भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश आयटी सेल कार्यकारिणीच्या सह संयोजक पदी गणेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या या नियुक्तीनंतर सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे
या नियुक्ती नंतर गणेश जाधव म्हणाले, “ना राजकीय पार्श्वभूमी, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या युवकाला एवढा मोठा सन्मान पुन्हा एकदा भाजप ‘आयटी सेल’ कार्यकारिणीच्या सह संयोजकपदी पदी नियुक्ती करून दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी जाधव यांच्यावर विश्वास ठेवून जी जबाबदारी आपण दिली आहे. त्या अनुसरून पक्षाचे कार्य, विचार शेवटच्या घटकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आयुष्यातील प्रत्येक क्षण देईन अशी ग्वाही यावेळी गणेश जाधव यांनी दिली.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया व आयटीची जबाबदारी देऊन पक्षाच्या नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दर्शविला व कार्यकर्त्याला नेतृत्वाने अशी संधी देण्याचा प्रकार फक्त भाजपात घडतो. भाजपाचा कार्यकर्ता असण्याचा मला अभिमान आहे, असेही ते यावेळी जाधव म्हणाले.