पुणे, 14 जून : मराठा आरक्षणाच्या (maratha reservation)मुद्यावर खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje)आणि उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची पुण्यात अखेर भेट झाली. या भेटीनंतर आम्ही दोघे एकाच घराण्याचे आहोत, त्यामुळे इथं वेगळा विषय येत नाही. मराठा आरक्षणासाठी दोन्ही घराणे एकत्र आली आहे, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली.
खासदार संभाजीराजे छत्रपती व उदयनराजे भोसले यांची आज पुण्यात भेट झाली. पुण्यातील औंध बॅनर रोडवर असलेल्या उदयनराजे भोसले यांच्या मित्राच्या घरी ही भेट झाली. या भेटीनंतर पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.