पुणे, 14 जून : पुण्यात (pune Corona cases) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे निर्बंध हटवण्यात आले आहे. आजपासून पुणेकरांना आणखी मोकळा श्वास घेता येणार आहे. पुण्यात (Pune unlock) आजपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकानं सुरू राहणार आहे तर हॉटेल्स, बार आणि रेस्टरंट रात्री 10 वाजेपर्यंत खुली राहणार आहे.
पुण्यात कोरोनाचा संसर्ग दर 5 टक्कांपेक्षा कमी आल्याने आणि ऑक्सिजन बेडसची संख्या पुरेशी असल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. नव्या नियमावलीनुसार, सर्व प्रकारची दुकाने आता सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत खुली राहतील. हॉटेल्स सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत सुरू राहतील आणि पार्सल रात्री 11 पर्यंत सुरू असेल.