PCMC : शहर पोलीस दलातील सहा निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

0
58

चिंचवड शहर पोलीस दलातील सहा पोलीस निरीक्षकांच्या (Chinchwad )अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत याबाबतचे आदेश सोमवारी (दि. 3) रात्री उशिरा देण्यात आले.

मागील काही दिवसांपासून शहर पोलीस दलात अंतर्गत बदल्यांची चर्चा सुरू होती. या चर्चांना अखेर विराम मिळाला असून पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अंतर्गत बदल्यांचे सोमवारी आदेश दिले.
बदली झालेले अधिकारी (कुठून कुठे)
दिलीप शिंदे (दिघी ते वाहतूक शाखा)
वर्षाराणी पाटील (देहूरोड ते वाहतूक शाखा)
ज्ञानेश्वर काटकर (गुन्हे शाखा युनिट एक ते चिखली)
मछिद्र पंडीत (गुन्हे शाखा युनिट चार ते दिघी)
वसंत बाबर (चिखली ते महाळुंगे)
ज्ञानेश्वर साबळे (महाळुंगे ते देहूरोड)
सहा अधिकारी बढतीच्या आदेशासाठी ताटकळले
पोलीस निरीक्षक ते सहाय्यक पोलीस आयुक्त / पोलीस उपअधीक्षक पदावर बढतीची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र त्याबाबतचे राज्याच्या गृह विभागाने आदेश काढलेले नाहीत. त्या यादीमध्ये पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील सहा पोलीस निरीक्षकांची नावे आहेत. या अधिकाऱ्यांची कागदपत्रांची पूर्तता देखील झाली आहे. मात्र गृह विभागाकडून याबाबत आदेश न काढले गेल्यामुळे हे अधिकारी बढतीसाठी ताटकळले आहेत. हे अधिकारी बढतीवर गेल्यानंतर (Chinchwad ) त्यांच्या जागी देखील इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.