Home पिंपरी-चिंचवड PCMC : पिंपरी चिंचवड शहराचा पारा वाढणार; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

PCMC : पिंपरी चिंचवड शहराचा पारा वाढणार; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

0
PCMC : पिंपरी चिंचवड शहराचा पारा वाढणार; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

 पिंपरी चिंचवड शहरातील तापमानात (Pimpri Chinchwad City temperature) वाढ होणार आहे. शनिवारी (दि. 1) शहरातील तापमान 33 अंश सेल्सिअस असून पुढील आठवड्यात पारा 37 अंशावर पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

शहरातील हवामान शनिवारी कोरडे आहे. सायंकाळी हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे विभागाच्या पुणे, पाषाण, लोहगाव, चिंचवड, लवळे, मगरपट्टा केंद्रांमध्ये लवळे केंद्रावर सर्वाधिक 35 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.

मध्य उत्तर प्रदेशापासून मध्यप्रदेश, विदर्भ ते तेलंगणापर्यंत समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागापासून उत्तर ओडिशापर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा

उन्हाचा चटका वाढल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ न देणे, दुपारच्या वेळी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, अशा सूचना देखील हवामान विभागाने केल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here