पुणे, 13 जून: मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा (Corona cases in pune) आलेख घसरत असला तरी म्युकरमायकोसीसचा (mucormycosis) धोका कमी झालेला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात म्युकरमायकोसीसचे अनेक रुग्ण आढळले आहे. यातील 242 रुग्णांनी आतापर्यंत म्युकरमायकोसीस या गंभीर आजारावर मात (242 patients discharge) केली आहे. जिल्ह्यात सध्या 636 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयांत उपचार सुरूआहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 90 रुग्णांचा मृत्यू म्युकरमायकोसीसमुळे झाला आहे.
पुणे जिल्ह्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून म्युकरमायकोसीसचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली होती. या आजारामुळे नागरिकात प्रचंड भीती पसरली होती. एप्रिल महिन्यात म्युकरमायकोसीसचे 355 रुग्ण आढळले होते. तर मे महिन्यात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांत वाढ होऊन हा आकडा 421 वर गेला. त्यानंतर जून महिन्यात पहिल्या दोन आठवड्यातचं 192 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात म्युकरमायकोसीसचे 968 रुग्ण आढळून आले आहेत. यातील 636 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर 90 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
पुणे महापालिकेच्या हद्दीत सर्वाधिक म्युकरमायकोसीस रुग्णांची नोंद झाली असून ही संख्या 406 इतकी आहे. यातील 97 रुग्ण पुर्णपणे बरे झाले आहेत. तर 280 रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहे. महापालिकेच्या हद्दीत आतापर्यंत 29 जणांचा म्युकरमायकोसीसमुळे मृत्यू झाला आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत 227 रुग्ण आढळून आले असून यातील 93 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. याठिकाणी सध्या 110 रुग्णांर उपचार सुरू असून आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे.