पुणे, 10 जून : कोरोनाच्या संकटाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर संपूर्ण जगच एका ठिकाणी अडकल्याचं पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन (Lockdown) बाहेर सर्वकाही बंद असल्यामुळं सगळेच घरात आहेत. शक्य आहे ते सर्व घरातून काम करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी कौटुंबीक वाद (Family ) वाढल्याचं पाहायलाल मिळत आहे. यातील अनेक वाद विकोपाला जाऊन पोलिसांपर्यंत पोहोचत आहेत. विशेष म्हणते पुरुषही छळाचे बळी ठरत असल्याच्या तक्रारी येत आहेत. पुण्यामध्ये पोलिसांच्या कौटुंबीक प्रकरण सोडवणाऱ्या ‘भरोसा कक्षा’कडंदेखिल अशा तक्रारी दाखल झाल्या आहेत.
‘भरोसा कक्षा’कडं दाखल झालेल्या तक्रारींचा विचार करता पुण्यात गेल्या दीड वर्षामध्ये जवळपास 3 हजारांवर तक्रारी आल्या आहेत. यात विशेष बाब म्हणजे महिला आणि पुरुष दोघांच्या तक्रारींची संख्या जवळपास अर्धी-अर्धी आहे. पत्नीकडून पतीला मारहाण, मानसिक आणि शारीरिक छळाचे प्रकार वाढत असल्याच्या या तक्रारी आहेत. केवळ पुण्यात दीड वर्षांत अशा 1535 तक्रारी पुरुषांकडून पत्नीच्या विरोधात करण्यात आल्या आहेत.