Home पिंपरी-चिंचवड Pune : सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारची टोकाची बेअब्रू – गोपाळ तिवारी 

Pune : सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारची टोकाची बेअब्रू – गोपाळ तिवारी 

0
Pune : सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारची टोकाची बेअब्रू – गोपाळ तिवारी 

  राज्यातील न्यायप्रविष्ट असंवैधानिक (एकनाथ व देवेंद्रजींचे) ईडी सरकार’च्या कार्यक्षमतेवर सर्वोच्च न्यायालयाने केलेले संतप्त भाष्य (राज्य सरकार नपुसंक झाले काय..?) हे आजवरच्या इतिहासातील महाराष्ट्राची सर्वोच्च नामुष्की असुन, सरकारने तातडीने पायउतार व्हावेत असेच आहेत. विशेष करून ‘राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर’ केलेले हे भाष्य विचारात घेता याची प्रचिती देखील आज संभाजीनगर (औरंगाबाद) व जळगाव येथील दंगलीचे प्रकार पाहता राज्यातील जनतेस आली आहे. (Pune) त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने राजीनामा घ्यावा व आपण सरकार चालवण्यास व कायदा सुव्यवस्था सांभाळण्यास सक्षम नसल्याचे दाखवावे अशी मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली..! 

राजकीय घरफोड्या करुन सत्तेवर आलेले असंवैधानिक, न्यायप्रविष्ट व कथित हिंदुत्ववादी..(?) सरकार सत्तेवर असुन सुध्दा सामाजिक सौहार्दता बिघडवण्याचे काम करत असल्याची दखल प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयानेच घेतली.. जर हिंदुत्व वादी सरकार सत्तेत असुनही ठीक ठीकाणी हिंदुंवर “आक्रोश – मोर्चा” काढण्याची दुर्दैवी वेळ येत असेल तर.. हिदुं करीता ही नामुष्कीची बाब असुन, हिंदु धर्मियांना रस्त्यावर उतरून, कोणत्या(?) धर्मा विरोधी व त्यांच्या अत्याचारा विरोधी निदर्शने करावी लागत आहेत.. ? हे देखील न्यायालया प्रमाणे जनतेस पडलेला प्रश्न आहे..! ‘सरकारच्या नाका खाली’च् कोणा हिंसक प्रवृत्तींच्या झुंडशाही मुळे, उथळ व पोरकट पणाने द्वेषमुलक असंवैधानात्मक कृत्ये होत आहेत काय..(?) असा संतप्त सवाल देखील सर्वोच्च न्यायालयाने केला.

सामाजिक व धार्मिक – जातीयवादी द्वेष निर्माण करण्याचे द्वेष मुलक गोष्टी काही विध्वंसक प्रवृत्ती करत असतील तर सरकार बध्याची भुमिका धेत नपुसंक बनले काय..(?) असे ही सर्वोच्च न्यायालयाने केलेले भाष्य दर्शवते आहे..!  संताची, वारी व वारकऱ्यांची परंपरा असलेल्या महाराष्ट्राची कधी नव्हे ईतकी (Pune) बदनामी या न्यायप्रविष्ट असंवैधानिक ईडी सरकारच्या काळात झाली असुन हे महाराष्ट्राचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाल्याचे देखील काँग्रेस ने दिलेल्या निवेदनात सांगित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here