Home महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पुण्यात विकेंड लॉकडाऊन असतानाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

पुण्यात विकेंड लॉकडाऊन असतानाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

0
पुण्यात विकेंड लॉकडाऊन असतानाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

पुणे, 19 जून: पुणे शहरातील (Pune) कोविड रुग्णसंख्या (Covid) कमी होत असल्याचं पहायला मिळत आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याने पुण्यातील निर्बंध हळूहळू शिथील होत आहेत. मात्र, विकेंड लॉकडाऊन अद्यापही कायम असून शनिवार-रविवार पुण्यात केवळ अत्यावश्यक सुविधा वगळता इतर निर्बंध कायम आहेत. पण असे असले तरी आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP workers Pune) कार्यकर्त्यांनी केलेली गर्दी (NCP workers gathering) पाहून कोरोनाचं गांभीर्य नाहीये का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुणे शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलं. अजित पवार (Ajit Pawar) कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर तुफान गर्दी केली होती. कोविड प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन यावेळी पहायला मिळालं.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सकाळीच आपल्या कार्यकर्त्यांना कार्यक्रमस्थळी गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. मात्र, असे असतानाही कार्यक्रमस्थळावर मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते. पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी गर्दी झाल्याबद्दल अजित पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली.

निवडणुकांपूर्वी शक्तीप्रदर्शन ?

पुणे मनपा निवडणुकीआधीचं राष्ट्रवादीचं शक्तीप्रदर्शन आहे का? कोरोनाचे प्रतिबंध धाब्यावर बसवून आणि पुणे मनपावर पुन्हा सत्ता आणण्यासाठीच राष्ट्रवादीची ही जय्यत तयारी आहे का? असे प्रश्न आता विचारले जात आहेत.

अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त

अजित पवारांनी ही गर्दी पाहून दिलगिरी व्यक्त केली आहे. अजित पवार म्हणाले, सकाळी सात वाजता उद्घाटन करायला हवं होत म्हणजे कमी लोक आले असते. गाडीतून उतरताना एकदा मनात आल होत निघून जावं, पण कार्यकर्त्यांना वाईट वाटेल. धरता ही येत नाही आणि सोडता ही येत नाही अशी माझी अवस्था, मी दिलगिरी व्यक्त करतो.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here