
दोन गटात आधी शाब्दिक चकमक आणि त्यानंतर भांडणाचं रुपांतर हाणामारीत झालं. रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान हा तणाव निर्माण झाला. दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना येथे लाठीचार्जही करावा लागला. तसेच या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.