Home पिंपरी-चिंचवड आषाढी वारी परंपरेनुसार पायी नेण्यासाठी शासनाने तात्काळ परवानगी द्यावी

आषाढी वारी परंपरेनुसार पायी नेण्यासाठी शासनाने तात्काळ परवानगी द्यावी

0
आषाढी वारी परंपरेनुसार पायी नेण्यासाठी शासनाने तात्काळ परवानगी द्यावी
पुणे, 13 जून: गेल्यावर्षी प्रमाणे यंदाच्या आषाढी वारीवर (Ashadi Wari) सुद्धा कोरोनाचं (Corona) सावट आहे. त्यामुळे यंदाही वारी संदर्भात सरकारने (Maharashtra Government) नियमावली जाहीर केली आहे. कोविड संदर्भातील सर्व नियमांचे पालन करु मात्र, पायी वारीची परवानगी द्या असे आवाहन वारकऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. याच संदर्भात विश्व वारकरी सेनेने (Vishwa Varkari Sena) राज्य सरकारला एक अल्टिमेटम दिला आहे.

आषाढी वारी परंपरेनुसार पायी नेण्यासाठी शासनाने तात्काळ परवानगी द्यावी या मागणीसाठी आता विदर्भातील वारकरी संघटना आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. सगळ्यां दिंडयाना अशी परवानगी देणं शक्य नसल्यास किमान ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला सर्व अटी घालून परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

24 जूनच्या आत ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखी सोहळ्याला किमान 50 वारकऱ्यांच्या उपस्थितीत पायदळ परवानगी द्या. ही परवानगी न दिल्यास सरकार आम्हाला सांगतोय माझे कुटुंब माझी जबाबदारी तर आम्ही सरकारला सांगतो ‘माझी वारी माझी जबाबदारी’ याने नियमाने कोरोना निगेटिव्हचे रिपोर्ट सोबत घेऊन आम्ही माऊलीच्या प्रस्थानाच्या दिवशी कोरोनाचे सर्व नियम पाळून आळंदी पायदळ जाणार आहोत. आमच्या सोबत इतर वारकरी संघटना सुद्धा येणार आहेतच म्हणून सरकारने काल दिलेल्या निर्णयाचा फेरविचार करून नऊ मानाच्या पालकांमधून किमान दोन ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखी सोहळ्याला पायदळ करता परवानगी द्यावी असं विश्व वारकरी सेनेने म्हटलं आहे.

अमरावती येथे कलेक्टर ऑफिसमध्ये नाना पटोले आणि यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत विदर्भातील दिंडी चालक व काही संघटनांची बैठक पार पडली. नाना पटोले विदर्भातील दिंडी चालकांची नोंदणी आमच्या जवळ नसल्यामुळे अमरावती येथील कमिशनर ऑफीस येथे रितसर नोंदणी करून घ्यावी त्यांच्या मागणीचा विचार निश्चित केला जाईल असे आश्वासन दिले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here