Sunday, July 25, 2021
Homeमनोरंजनpneumonia causes symptoms and treatment: Pneumonia: न्यूमोनियाची ‘ही’ लक्षणे ठरत आहेत करोनाला...

pneumonia causes symptoms and treatment: Pneumonia: न्यूमोनियाची ‘ही’ लक्षणे ठरत आहेत करोनाला जबाबदार, नसीरूद्दीन शाहांनाही केलं होतं रुग्णालयात दाखल!

अलीकडेच बॉलिवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह यांना न्यूमोनियामुळे रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं. त्यांच्या फुफ्फुसात एक पॅच सापडला. न्यूमोनिया सौम्य ते तीव्र अशा वेगवेगळ्या स्वरूपात होऊ शकतो. पण जर आपण वेळेत त्याचे संकेत आणि लक्षणे ओळखली तर या आजाराचा सामना करणे सोपे जाऊ शकते. तज्ञांच्या मते न्यूमोनिया एक किंवा दोन्ही फुफ्फुसात होणारे संक्रमण आहे, ज्यामुळे एयर सॅकला संसर्ग होतो. बॅक्टेरिया आणि व्हायरस हे यामागील वास्तविक कारण आहे.

न्यूमोनियाने संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या फुफ्फुसात असलेल्या हवेच्या थैलीमध्ये द्रव किंवा पू भरतं, ज्यामुळे खोकला, छातीत दुखण्या व्यतिरिक्त त्या व्यक्तीस श्वास घेणेही कठीण होते. कधी कधी न्यूमोनिया वाढल्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. न्यूमोनिया नेहमीच घातक नसतो पण आपण जितक्या लवकर त्याची लक्षणे ओळखू तितक्या लवकर आपण बरे होऊ शकतो.

कफ आणि खोकला

pneumonia causes symptoms and treatment: Pneumonia: न्यूमोनियाची ‘ही’ लक्षणे ठरत आहेत करोनाला जबाबदार, नसीरूद्दीन शाहांनाही केलं होतं रुग्णालयात दाखल!

खोकला अनेक कारणांमुळे होऊ शकतो. धूम्रपानासोबतच संसर्ग अगदी रासायनिक संपर्कामुळे देखील खोकला येतो. या प्रकारच्या खोकल्याला उपचारांची अजिबात आवश्यकता नसते. परंतु आपल्याला हे कसे समजेल की हा खोकला न्यूमोनियाचा आहे की नाही? तर मंडळी जर खोकला बरा होण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच वाढत असेल तर ते न्यूमोनियाचे लक्षण आहे. सर्दी किंवा फ्लू झाल्यानंतर आजारी वाटणार्‍या कोणत्याही व्यक्तीने वैद्यकीय चाचणी करावीच. जर एखाद्या व्यक्तीला कफमुळे खोकला लागला असेल, विशेषतः जर कफ दाट, हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचा असेल तर थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि वेळ न घालवता डॉक्टरांशी संपर्क साधावा.

(वाचा :- एका दिवसात किती वेळा लघुशंका होणं आहे सामान्य गोष्ट? यापेक्षा जास्त वेळा जावं लागत असेल तर व्हा सावध!)

प्रचंड ताप येणं

pneumonia causes symptoms and treatment: Pneumonia: न्यूमोनियाची ‘ही’ लक्षणे ठरत आहेत करोनाला जबाबदार, नसीरूद्दीन शाहांनाही केलं होतं रुग्णालयात दाखल!

जर आपल्याला १०२ डिग्री फॅरेनहाइट किंवा त्याहून अधिक ताप असल्यास डॉक्टरांकडे जाण्यास उशीर करू नका. ताप आणि थंडी ही न्यूमोनियाची सामान्य लक्षणे असली तरीही 105 डिग्री फॅरेनहाइटचा ताप न्यूमोनिया दर्शवितो. जर तुम्ही कुटुंबातील एखाद्या वृद्ध सदस्य किंवा मित्राची काळजी घेत असाल तर हे लक्षात ठेवा की कधी कधी 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कमी ताप असताना देखील न्यूमोनिया होऊ शकतो.

(वाचा :- Yoga For Diabetes : मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी रामबाण ठरतील ही ‘७’ योगासनं, कधीच वाढणार नाही साखरेची पातळी)

छातीत तीव्र वेदना

pneumonia causes symptoms and treatment: Pneumonia: न्यूमोनियाची ‘ही’ लक्षणे ठरत आहेत करोनाला जबाबदार, नसीरूद्दीन शाहांनाही केलं होतं रुग्णालयात दाखल!

जर आपल्या छातीत तीव्र वेदना होत असतील तर तुम्हाला न्यूमोनिया होऊ शकतो. या वेदना सहसा खोकताना किंवा शिंकतानाही जाणवतात. कधी कधी पायर्‍या चढणे आणि वाळवलेले कपडे उतरवणे यासारख्या छोट्या छोट्या कामांदरम्यान देखील थकवा आल्याचा आणि श्वास लागल्याचा अनुभव येऊ शकतो.

(वाचा :- या 120 किलो वजनाच्या मुलीला लागायचे XXL साइजचे कपडे, ‘या’ ट्रिक्सच्या मदतीने घटवलं 30 Kg वजन!)

थेट मेंदूला समस्या

pneumonia causes symptoms and treatment: Pneumonia: न्यूमोनियाची ‘ही’ लक्षणे ठरत आहेत करोनाला जबाबदार, नसीरूद्दीन शाहांनाही केलं होतं रुग्णालयात दाखल!

अचानक गोंधळलेली मानसिक स्थिती चिंता करण्याचे कारण ठरते. 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये न्यूमोनियाची प्राथमिक लक्षणांमध्ये विचित्र वागणं हे देखील येतं. कारण न्यूमोनिया फुफ्फुसांची ऑक्सिजन आणि कार्बनडायऑक्साईड वाहून नेण्याची क्षमता कमी करते. हेच कारण आहे ज्यामुळे न्यूमोनिया ग्रस्त लोकांना श्वास घेताना त्रास होतो. ही दोन्ही कारणे मेंदूत फ्रेश ऑक्सिजनचा पुरवठा न होण्यास देखील कारणीभूत ठरतात.

(वाचा :- ‘ही’ सात फळं खाल्ल्याने पावसाळ्यात तुम्ही पडणार नाही आजारी, रोगप्रतिकारक शक्तीही होईल दुप्पट)

अस्वस्थ वाटणं

pneumonia causes symptoms and treatment: Pneumonia: न्यूमोनियाची ‘ही’ लक्षणे ठरत आहेत करोनाला जबाबदार, नसीरूद्दीन शाहांनाही केलं होतं रुग्णालयात दाखल!

कधी कधी आपण सर्दी, ताप किंवा संसर्गानंतरही हळू हळू बरे होतो. परंतु जर सुधारणा झाल्यानंतर अचानक तुम्हाला पुन्हा अस्वस्थ वाटू लागले तर दुय्यम संसर्ग होण्याची शक्यता आहे. शिवाय जेव्हा आपले शरीर जंतूंच्या एका गटाशी लढत असते तेव्हा इतर जंतूंना आपल्या शरीरावर आक्रमण करणं सोपं जातं. म्हणूनच जर काही दिवस श्वासोच्छवासाचा त्रास झाल्यानंतर बरे होण्याऐवजी अधिक त्रास होऊ लागला तर उशीर न करता ताबडतोब डॉक्टरांकडे जा व योग्य ते उपचार घ्या.

(वाचा :- Delta Plus : वॅक्सिन घेतलेले लोक देखील होत आहेत ‘या’ भयंकर विषाणूचे शिकार! कोणाला आहे सर्वाधिक धोका?)

न्यूमोनियापासून बचाव करण्यासाठी महत्वपूर्ण टिप्स

pneumonia causes symptoms and treatment: Pneumonia: न्यूमोनियाची ‘ही’ लक्षणे ठरत आहेत करोनाला जबाबदार, नसीरूद्दीन शाहांनाही केलं होतं रुग्णालयात दाखल!

न्यूमोनिया टाळण्यासाठी धूम्रपान सोडणे आवश्यक आहे. ही सवय तुम्हाला श्वसन संक्रमण, विशेषत: न्यूमोनिया होण्यास अधिक संवेदनशील बनवते.

  • साबण आणि पाण्याने नियमितपणे हात स्वच्छ धुवा
  • खोकताना आणि शिंकताना तोंडावर हात ठेवा. यासाठी वापरल्या गेलेल्या टिश्यूंची त्वरित विल्हेवाट लावा
  • रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा
  • पुरेशी विश्रांती घ्या, निरोगी आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा
  • तशी तर फ्लूची लस लावून न्यूमोनियाचा धोका वाढण्यापासून रोखता येऊ शकतो. न्यूमोनियाच्या गंभीर लक्षणांमध्ये उच्च ताप, छातीत दुखणे, श्वास लागणे आणि सतत खोकला यांचा समावेश आहे. म्हणूनच, जेव्हा तुम्हाला अशी न्यूमोनियाची एक किंवा अधिक लक्षणे दिसू लागतील तेव्हा ताबडतोब डॉक्टरांकडे जा

(वाचा :- Yoga For Knee Pain : लठ्ठपणा, गुडघेदुखी, पोट साफ न होणं, निरुत्साह या समस्यांपासून मिळेल कायमची मुक्ती, करा हे ५ मिनिटांचं आसन!)Source link

pneumonia causes symptoms and treatment: Pneumonia: न्यूमोनियाची ‘ही’ लक्षणे ठरत आहेत करोनाला जबाबदार, नसीरूद्दीन शाहांनाही केलं होतं रुग्णालयात दाखल!
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News