माझ्याशी मैत्री कर, म्हणत सहकारी महिला पोलिसाचा विनयभंग

0
48

अहमदनगर (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन 

रात्रीच्यावेळी डयुटीवर असताना पोलिस हवालदाराने आपल्या सहकारी महिला पोलिसाचा विनयभंग केल्याची घटना अकोले तालुक्यातील राजूर पोलिस ठाण्यात घडली. याप्रकरणी हवालदार भाऊसाहेब आघाव याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रात्रीच्या वेळी कामावर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यावर मैत्री करण्यासाठी दबाव आणून विनयभंग केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

पीडित महिला पोलिस कर्मचाऱ्याने जिल्हा पोलिस कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर आघाव याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रात्री कामावर असताना या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर त्यांचे सहकारी असलेला आरोपी भाऊसाहेब आघाव याने माझ्याशी मैत्री कर, असे म्हणत त्यांचा विनयभंग केला. या घटनेनंतर लगेच महिला पोलिसाने वरिष्ठांकडे तक्रार केली.तक्रारीनंतर आरोपी आघाव याने महिलेची लेखी माफी मागितली. यापुढे असे करणार नाही, असे सांगून महिलेने बदलीची मागणी करून काही काळ प्रकरण थांबले होते. मात्र पुन्हा आरोपीने महिलेची छेडछाड काढली. त्यामुळे महिला पोलिसाने अहमदनगर मुख्यालयात येऊन वरिष्ठांकडे तक्रार केली. आरोपीविरूद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. त्यानुसार शनिवारी रात्री आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नितीन खैरनार तपास करत आहे.

Source link