Thursday, July 29, 2021
Homeक्रीडाPrashant Kishor And Sharad Pawar Meet Over At Delhi

Prashant Kishor And Sharad Pawar Meet Over At Delhi


नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाली. साधारण अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तीन दिवसांत या दोघांची दिल्लीत दुसऱ्यांदा भेट होत आहे. यापूर्वी प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी शरद पवारांची मुंबईत भेट घेतली होती. दोघांमध्ये सुरु असलेल्या भेटीच्या सत्रामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात आजपर्यंत तीन भेटी झाल्या. या दोघांची पहिली भेट शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी सिल्वर ओकवर झाली होती. 

दोन्हीही नेते तिसऱ्या आघाडीचा विषय हा अजेंड्यावर नसल्याचं सांगतात. मात्र तरीदेखील या दोघांमध्ये गाठी-भेटीचं सत्र सुरु असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या 48 तासांमधील शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची ही दुसरी भेट आहे. तर पंधरा दिवसातील ही तिसरी भेट आहे. अशातच आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एबीपी माझाशी बातचित केली. त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की, प्रशांत किशोर यांच्या बैठकीत तिसऱ्या आघाडीचा विषय नव्हता.  मात्र सध्याची जी राजकीय स्थिती आहे, त्यामध्ये विरोधकांना कसं आणखी आक्रमक होता येईल, यासंदर्भात चर्चा झाली. अशातच प्रशांत किशोर यांनी यापूर्वीत आपण निवडणूक व्यवस्थापनातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळेच या भेटीच्या सत्राबाबत सर्वांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. 

दरम्यान, काल शरद पवारांच्या विरोधात 15 नेत्यांची बैठक पार पडली आणि मोदी सरकारच्या विरोधात संभाव्य तिसऱ्या आघाडी विरोधातील चर्चांना उधाण आलं. मात्र सध्या तिसऱ्या आघाडीचा विषय अजेंड्यावर नाही, असं शरद पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे. सध्याच्या राजकीय स्थितीसंदर्भात अधिक आक्रमक होण्यासाठी काय करता येईल, याची चर्चा कालच्या बैठकीत झाल्याचं शरद पवारांनी सांगितलं. कोरोना काळात मोदींच्या प्रतिमेला तडा गेलाय, पण समोर मजबूत पर्याय नसल्यानं राजकीय फटका किती बसेल याबाबत शंका असल्यानं विरोधकांनी रणनीती आखण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले.Source link

Prashant Kishor And Sharad Pawar Meet Over At Delhi
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News