Pratap Sarnaik: ‘भाजपशी जुळवून घ्या’ म्हणणारे प्रताप सरनाईक प्रथमच मीडियासमोर – money laundering case shiv sena mla pratap sarnaik reaction on ed

0
17


हायलाइट्स:

  • प्रताप सरनाईक विधिमंडळात दाखल
  • ईडीच्या कारवाईवर केले भाष्य
  • अधिवेशनासाठी विधिमंडळात उपस्थित

मुंबईः ईडीच्या रडारवर असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक विधिमंडळात दाखल झाले आहे. गेले कित्येक महिने राजकीय व सामाजिक कार्यक्रमांपासून दूर असलेले प्रताप सरनाईक आज पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले असून त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनी लॉण्ड्रिंगप्रकरणी प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीच्या कारवाईवरुन सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत जुळवून घेण्याची मागणी केली होती. त्यामुळं प्रताप सरनाईक पुन्हा चर्चेत आले होते. सरनाईक अज्ञातवासात असल्यानं विरोधकांनीही त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. या सर्व घडामोडीनंतर प्रताप सरनाईक हे आज विधानभवनात दाखल झाले आहे. तसंच, त्यांच्यावरील ईडीच्या कारवाईचा निषेधही केला आहे.

वाचाः युतीबद्दल बोलताना राऊतांनी दिला आमीर खान-किरण रावच्या नात्याचा दाखला

‘या देशात किंवा कुठेही माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नाही किंवा तक्रार नाही. कोणीही माझ्याविरोधात जबाब दिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयानं संरक्षण दिलं आहे. ईडीच्या कारवाईमुळं मी गायब झालो असं नाही. माझ्यावर हृदयरोगाची शस्त्रक्रिया झाली व माझी पत्नीही कर्करोगामुळं आजारी आहे. त्यामुळं मी शांत बसण्याचा निर्णय घेतला होता,’ असं स्पष्टीकरण सरनाईक यांनी दिलं आहे.

वाचाः कोल्हापुरकरांना मोठा दिलासा; दुकानांबाबत सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

‘मी काही विजय माल्या किंवा नीरव मोदी नाही जो गायब होणार किंवा बाहेर जाणार. कचाट्यात सापडलो म्हणून पळून जाणार असं नाही. अधिवेशनाला सर्व आमदारांनी हजर राहण्याच्या सूचना पक्षानं दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार आज मी विधिमंडळात हजर झालो आहे,’ असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.Source link