प्रियंकाच्या बोल्ड व हॉट फिगरची पार्टीमध्ये रंगली जोरदार चर्चा, फोटो पाहून म्हणाल ‘सौंदर्याची राणी’

0
52
कलाकारांचे महागडे कपडे, दागिने, त्यांची लाइफस्टाइल जाणून घेण्यास अनेकांना रस असतो. सोशल मीडियावर याची बरीच चर्चा देखील रंगते. अनेकदा तर ड्रेसिंग स्टाइलमुळे कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या बाबतीत देखील बऱ्याचदा असंच घडतं. मात्र फॅशनबाबात वेगवेगळे प्रयोग करणं ती काही सोडत नाही. प्रियंकाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, ‘पहिल्यापेक्षा आता मी फॅशनच्या बाबातीत अधिकाधिक प्रयोग करू लागली आहे. माझ्यावर कोणते आउटफिट चांगले दिसतात हे मला आता योग्य पद्धतीने समजलं आहे. महत्त्वाचं म्हणजे मी नवीन फॅशन ट्रेंड फॉलो करणं बंद केलं आहे.’

प्रियंका रेड कार्पेटवर अवतरली की साऱ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यास ती नेहमीच यशस्वी ठरते. कोणत्या आउटफिटमध्ये आपण अधिक आकर्षक दिसू हे प्रियंकाला चांगलंच ठाऊक झालं आहे. बी-टाउनमधील पार्ट्यांमध्ये तर तिचा वेगळाच लुक पाहायला मिळतो. वेस्टर्न आउटफिटच्या प्रेमात असणारी ही अभिनेत्री पारंपरिक पोषाखाला देखील तितकंच महत्त्व देते. साडीमधील तिचा हॉट आणि ग्लॅमरस अवतार तर सगळ्यांनाच घायाळ करतो. असंच काहीसं अंबानी कुटुंबीयांच्या एका पार्टीमध्ये घडलं. या पार्टीमध्ये प्रियंका साडी नेसून आली अन् तिची हॉट फिगर आणि ग्लॅमरस अवतार पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

​लाल रंगाच्या साडीमधील हॉट लुक

प्रियंकाच्या बोल्ड व हॉट फिगरची पार्टीमध्ये रंगली जोरदार चर्चा, फोटो पाहून म्हणाल ‘सौंदर्याची राणी’

वेस्टर्न आउटफिटमध्ये खुलून दिसणारी प्रियंका पारंपरिक पोषाखामध्येही तितकीच सुंदर आणि मोहक दिसते. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या साखरपुड्याच्या पार्टीमधील प्रियंकाची साडी. या पार्टीला बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. मात्र या पार्टीमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेण्यास प्रियंका यशस्वी ठरली. प्रियंकाने पती निक जोनससह या पार्टीला हजेरी लावली. निकने रॉयल निळ्या रंगाची पँट आणि सूट परिधान केला होता. तर प्रियंकाने लाल रंगाची साडी नेसली होती. या साडीमधील तिची हॉट फिगर आणि फिटनेस पाहून सगळेच हैराण झाले.

आकर्षक डिझायनर साडी

प्रियंकाच्या बोल्ड व हॉट फिगरची पार्टीमध्ये रंगली जोरदार चर्चा, फोटो पाहून म्हणाल ‘सौंदर्याची राणी’

आजवर प्रियंकाचे पारंपरिक पोषाखामधील बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तिच्या पारंपरिक पोषाखामधील लुकला नेटकऱ्यांची पसंतीही मिळते. अंबानी कुटुंबियांच्या पार्टीमध्ये देखील तिचा पारंपरिक पोषाखामधील ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. सुप्रसिद्ध डिझायनर संदीप खोसलाने ही साडी डिझाइन केली होती. या साडीमध्ये तिची टोन्ड आणि बोल्ड फिगर दिसत होती. शिवाय लाल रंग तिच्यावर अगदी खुलून दिसत होता. बॉलिवूडमधील टॉप ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीमध्ये प्रियंकाचं नाव का घेतलं जातं? याचं उत्तर तुम्हाला हा फोटो पाहून नक्कीच मिळेल.

​पार्टीमध्ये प्रियंकाचीच चर्चा

प्रियंकाच्या बोल्ड व हॉट फिगरची पार्टीमध्ये रंगली जोरदार चर्चा, फोटो पाहून म्हणाल ‘सौंदर्याची राणी’

प्रियंकाने या पार्टीसाठी लाल रंगाच्या साडीला पसंती दिली होती. या साडीवर गोटा पट्टी वर्क करण्यात आलं होतं. साडी अधिक उठून दिसावी म्हणून मोठी चमकदार बॉर्डर तसेच मिरर वर्क डिझाइन ब्लाउजचा टच देण्यात आला होता. ही साडी तयार करण्यासाठी शिफॉन, ऑर्गेंजा आणि जॉर्जेट फॅब्रिकचा वापर करण्यात आला होता. या फोटोमधील भडक रंगाच्या साडीमध्ये प्रियंका भलतीच क्युट दिसत आहे. तुम्ही देखील एखाद्या कार्यक्रमासाठी प्रियंकाचा हा देसी लुक फॉलो करू शकता.

​सुपर हॉट ब्लाउज

प्रियंकाच्या बोल्ड व हॉट फिगरची पार्टीमध्ये रंगली जोरदार चर्चा, फोटो पाहून म्हणाल ‘सौंदर्याची राणी’

या साडीवर प्रियंकाने सोनेरी रंगाचा कटआउट स्लिव्हज् ब्लाउज परिधान केला होता. तसेच या ब्लाउजला डिप लो-कट नेकलाइन टच देण्यात आला होता. प्लेन साडीवर ब्लाउज अधिक उठून दिसावा म्हणून बारीक एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती. विशेष म्हणजे प्रियंकाची हॉट फिगर तिच्या सौंदर्यामध्ये अधिक भर घालत होती. परफेक्ट कसं दिसता येईल याकडे तिने पुरेपुर लक्ष दिलं होतं. प्रियंकाने आपल्या बॉडी टाइपनुसार या आउटफिटला टाइट लुक दिला होता. तसेच साडीचा पदर देखील सेफ्टी पिन्सने सेट करण्यात आला होता.

​परफेक्ट लुक

प्रियंकाच्या बोल्ड व हॉट फिगरची पार्टीमध्ये रंगली जोरदार चर्चा, फोटो पाहून म्हणाल ‘सौंदर्याची राणी’

प्रियंकाला फॅशनच्या बाबातीत सारं काही परफेक्ट लागतं. तिच्या ड्रेसिंग स्टाइलकडे पाहून ते लक्षात येतंच. या साडीमधील देखील आपण एकदम परफेक्ट दिसावं म्हणून प्रियंकाने दागिन्यांची निवड देखील योग्य केली होती. आम्रपाली ज्वेल्सने डिझाइन केलेले ड्राप डाउन झुमके प्रियंकाने घातले होते. तसेच अनमोल ज्वेलर्सने डिझाइन केलेल्या बांगड्या आणि अंगठी घालण्यास तिने प्राधान्य दिलं. तसेच तिचा मेकअपही अगदी आकर्षक होता. लाइट टोन फाउंडेशन, लाल रंगाची लिपस्टिक, आयलायनर, आयशॅडो, हिरवी टिकली असा प्रियंकाने मेकअप केला होता. त्याशिवाय साइड पार्टेट हेअरस्टाइल तिच्या सौंदर्यामध्ये अधिक भर घातल होती.

Source link