Sunday, July 25, 2021
HomeपुणेPune: 'आई, मला माफ कर!' चिठ्ठी लिहून पुण्यातल्या पोलीस शिपायानं संपवलं आयुष्य...

Pune: ‘आई, मला माफ कर!’ चिठ्ठी लिहून पुण्यातल्या पोलीस शिपायानं संपवलं आयुष्य | Pune


Pune: 'आई, मला माफ कर!' चिठ्ठी लिहून पुण्यातल्या पोलीस शिपायानं संपवलं आयुष्य

रज्जाक महम्मद मणेरी (Rajjak Maneri) असं आत्महत्या केलेल्या शिपायाचं नाव आहे. पुणे जिल्ह्यातल्या राजगड पोलीस ठाण्यात रज्जाक कार्यरत होता. ‘सॉरी मॉम’, असं चिठ्ठीत लिहून त्यानं आपलं आय़ुष्य संपवण्याचा निर्णय़ घेतला.

पुणे, 22 जून : पुणे (Pune News) जिल्ह्यातील भोर (Bhor) तालुक्यात राजगड पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस शिपायाने (Police Constable) आत्महत्या (Suicide) केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या पोलिस शिपायाने एक चिठ्ठी (Suicide Note) लिहून ठेवली होती. आपण आयुष्य संपवण्याचा निर्णय घेत असल्याबद्ल स्वतःच्या आईची माफी त्यानं या चिठ्ठीतून मागितली होती.

रज्जाक महम्मद मणेरी (Rajjak Maneri) असं आत्महत्या केलेल्या शिपायाचं नाव आहे. राजगड पोलीस ठाण्यात रज्जाक कार्यरत होता. सॉरी मॉम, असं चिठ्ठीत लिहून त्यानं आपलं आय़ुष्य संपवण्याचा निर्णय़ घेतला. अगोदर त्यानं स्वतःची नस कापली आणि त्यानंतर गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

रज्जाक मणेरी हा मूळचा इंदापूर तालुक्यातील रहिवासी. रज्जाक सोमवारपासून फोन उचलत नसल्यामुळं त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईक चिंतेत होते. काळजीपोटी त्याचे नातेवाईक त्याला भेटायला घरी पोहोचले. त्यावेळी गळफास घेतलेल्या अवस्थेतील रज्जाकचा मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. रज्जाक पोलीस दलात कार्यरत होता आणि आपल्या कामावर तो खुश असल्याचं त्याचे नातेवाईक सांगतात. एवढ्या तरुण वयात आणि उमेदीच्या काळात त्यानं अचानक असा आत्महत्येचा निर्णय घेतल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याचे कुटुंबीय आणि त्याच्यासोबत काम करणारे पोलीस सहकारीदेखील या प्रकाराने हादरून गेले आहेत.

हे वाचा – सिगारेट ओढण्यास केला विरोध; भाडेकरूने केली घरमालकाची हत्या

मानसिक आरोग्याची काळजी घ्या

सध्याच्या कोरोना काळात अनेक कारणांनी सर्वसामान्य माणसांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे. मनोविकार तज्ज्ञांकडील रुग्णांची संख्यादेखील गेल्या दीड वर्षांत वाढत असल्याचं चित्र आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे उद्योग बुडाले, तर अनेकजण देशोधडीला लागले. घराबाहेर पडता येत नसल्यामुळेदेखील अनेकांचं मनस्वास्थ्य बिघडलं. अशा प्रसंगी वेळ न दवडता आपली समस्या इतरांशी शेअर करण्याचा आणि तातडीनं मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्याचा सल्ला दिला जात आहे.


Published by:
Amol Joshi


First published:
June 22, 2021, 11:20 PM ISTSource link

Pune: 'आई, मला माफ कर!' चिठ्ठी लिहून पुण्यातल्या पोलीस शिपायानं संपवलं आयुष्य | Pune
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News