Monday, June 21, 2021
Homeपिंपरी-चिंचवडहे काय! पुण्यात कोरोनाच्या काळात वाढले पुरुषांवरील कौटुंबीक हिंसाचार, समोर आले आकडे

हे काय! पुण्यात कोरोनाच्या काळात वाढले पुरुषांवरील कौटुंबीक हिंसाचार, समोर आले आकडे

पुणे, 10 जून : कोरोनाच्या संकटाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर संपूर्ण जगच एका ठिकाणी अडकल्याचं पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन (Lockdown) बाहेर सर्वकाही बंद असल्यामुळं सगळेच घरात आहेत. शक्य आहे ते सर्व घरातून काम करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी कौटुंबीक वाद (Family ) वाढल्याचं पाहायलाल मिळत आहे. यातील अनेक वाद विकोपाला जाऊन पोलिसांपर्यंत पोहोचत आहेत. विशेष म्हणते पुरुषही छळाचे बळी ठरत असल्याच्या तक्रारी येत आहेत. पुण्यामध्ये पोलिसांच्या कौटुंबीक प्रकरण सोडवणाऱ्या ‘भरोसा कक्षा’कडंदेखिल अशा तक्रारी दाखल झाल्या आहेत.

‘भरोसा कक्षा’कडं दाखल झालेल्या तक्रारींचा विचार करता पुण्यात गेल्या दीड वर्षामध्ये जवळपास 3 हजारांवर तक्रारी आल्या आहेत. यात विशेष बाब म्हणजे महिला आणि पुरुष दोघांच्या तक्रारींची संख्या जवळपास अर्धी-अर्धी आहे. पत्नीकडून पतीला मारहाण, मानसिक आणि शारीरिक छळाचे प्रकार वाढत असल्याच्या या तक्रारी आहेत. केवळ पुण्यात दीड वर्षांत अशा 1535 तक्रारी पुरुषांकडून पत्नीच्या विरोधात करण्यात आल्या आहेत.

एकूण तक्रारींचा विचार करता पोलिसांकडे कौटुंबीक कलहाची जवळपास तीन हजार प्रकरण दाखल करण्यात आली आहेत. त्यात पुरुषांएवढ्यात महिलांच्याही तक्रारी आहेत. महिलांच्या तक्रारींची संख्या 1540 एवढी आहे. भरोसा कक्षाकडं येणाऱ्या पुरुषांच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. पत्नी नांदायला येत नाही किंवा किरकोळ वादातून पत्नी त्रास देत असल्याच्या तक्रार अर्जांचं प्रमाण जास्त आहे. बऱ्याचदा दाम्पत्यातील वाद कुटुंबात सोडविले जात नाहीत. पोलिसांकडे एखादा वाद आल्यास दाम्पत्यामधील वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सुजाता शानमे यांनी दिली आहे.

या तक्रार अर्जांपैकी 2394 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. यापैकी अनेक दाम्पत्यांमधील वाद सामोपचारानं मिटवण्यात आले आहेत. गेल्या वर्षी पुणे पोलिसांच्या भरोसा कक्षाकडं 1283 पुरुषांनी कौटुंबिक कलहाच्या तक्रारी दिल्या होत्या. तर महिलांकडून 791 अर्ज दाखल करण्यात आले होते.

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW