[ad_1]
येत्या काही दिवसांतच पुणे पोलीस ‘गुगल पे’ द्वारे दंडाची रक्कम भरण्याची डिजिटल सुविधा उपलब्ध करुन देण्याची तयारी करत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या लाचखोरीला आळा बसण्याची शक्यता आहे.
पुणे, 04 जून: राज्यात लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केलेली असतानाही, पुणे पोलीस लाचखोरी (Pune Police Bribery)करण्यामध्ये आघाडीवर असल्याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अलीकडेच जारी केला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागील पाच महिन्यात 23 सापळा कारवाया केल्या होत्या. सापळा रचून कारवाई केलेली ही सर्व प्रकरणं मोठ्या रक्कमेच्या लाचखोरीबाबत होती. पण वाहतूक नियमांचं किंवा संचारबंदीचं उल्लंघन केल्यास पोलिसांकडून नागरिकांची अडवणूक केली जाते. तसेच त्यांच्याकडून रोख रक्कम वसुली केली जाते. अशा लाचखोरीला आळा घालण्यासाठी पुणे पोलीस कॅशलेस (Cashless) होण्याच्या अनुषंगाने मोठे पाऊल टाकत आहेत.
येत्या काही दिवसांतच पुणे पोलीस ‘गुगल पे’ द्वारे दंडाची रक्कम भरण्याची डिजिटल सुविधा उपलब्ध करुन देण्याची तयारी करत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या लाचखोरीला आळा बसण्याची शक्यता आहे. खरंतर पुणे शहरात जवळपास 96 ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. याठिकाणी वाहनांची तपासणी केल्यानंतरचं त्यांना पुढे जाऊ दिलं जातं. या ठिकाणी पोलीस अडवणूक करतात. महत्त्वाचं काम असलं जाऊ देत नाहीत. नागरिकांना जबरदस्तीने 500 रुपयांची पावती करायला सांगतात.
पैसे नाहीत असं सांगितल्यास, पोलीस मित्राच्या अकाऊंटवर गुगल पे करायला सांगितलं जातं. यातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात लुट केली जाते. टार्गेट पूर्ण करण्यासाठी कारण नसताना पोलीस अगदी छोट्या कारणांसाठी पावत्या फाडतात, अशा अनेक तक्रारी नागरिकांनी वरिष्ठ पोलिसांकडे केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी कॅशलेस होण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा-मित्रांच्या मदतीनं प्रेयसीचे Video बनवले, Blackmail करत सर्वांनी केले अत्याचार
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन व्यवस्था तयार करण्यात येत आहे. पोलीस विभागाचं एक स्वतंत्र खातं काढण्यात येणार असून पुणे पोलीस दलातील सर्व 32 पोलीस ठाण्यांच्या नावाने स्वतंत्र स्कॅनिंग कोड देण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत किती दंड वसूल करण्यात आला. त्याची माहिती प्रत्येक दिवशी सायंकाळी समजू शकणार आहे. त्यामुळे लोकांना खासगी व्यक्तीच्या नावावर पैसे पाठवावे लागणार नाही. येत्या 2 ते 3 दिवसात ही योजना प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
[ad_2]
Source link