Home पुणे पुणेकरांसाठी खूशखबर! निर्बंध आणखी झाले शिथिल; पाहा कुठल्या स्तरात समावेश? | Coronavirus-latest-news

पुणेकरांसाठी खूशखबर! निर्बंध आणखी झाले शिथिल; पाहा कुठल्या स्तरात समावेश? | Coronavirus-latest-news

0
पुणेकरांसाठी खूशखबर! निर्बंध आणखी झाले शिथिल; पाहा कुठल्या स्तरात समावेश? | Coronavirus-latest-news

[ad_1]

पुणेकरांसाठी खूशखबर! निर्बंध आणखी झाले शिथिल; पाहा कुठल्या स्तरात समावेश?

पुण्यात सोमवारपासून काय लॉक आणि काय अनलॉक, वाचा सविस्तर…

पुणे, 5 जून : राज्य सरकारकडून आलेल्या नव्या नियमावलीनुसार अनेक जिल्ह्यांतील निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. अद्यापही राज्यातून कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे निर्बंध पूर्णपणे हटविण्यात येणार नाहीत. मात्र काही ठिकाणी नागरिकांना सुविधेचा लाभ घेता यावा, यादृष्टीने सूट देण्यात आली आहे. दरम्यान पुण्याचा समावेश तिसऱ्या स्तरात करण्यात आला आहे. तिसऱ्या स्तरानुसार पुण्यात अत्यावश्यक सेवेसह इतर दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत खुली राहणार आहेत. थिएटर आणि नाट्यगृह मात्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्ही दर पाच ते दहा टक्क्यांदरम्यान असेल आणि व्यापलेले ऑक्सीजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तो जिल्हा तिसऱ्या स्तरात येतील.

हे ही वाचा-EXPLAINER : पुण्यात कोरोनाची दुसरी लाट नेमकी कशी आटोक्यात आली?

स्तर पहिला – ज्या ठिकाणी पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल व व्यापलेल्या ऑक्सिजन बेडची टक्केवारी 25 ते 40 च्या दरम्यान असेल.

दुसरा स्तर – ज्या ठिकाणी पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल व व्यापलेल्या ऑक्सिजन बेड 40 टक्क्यांपेक्षा जास्त असेल.

तिसरा स्तर – ज्यांचा पॉझिटिव्ही दर पाच ते दहा टक्क्यांदरम्यान असेल आणि व्यापलेले ऑक्सीजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा जास्त असेल.

चौथा स्तर – ज्या ठिकाणी पॉझिटिव्हीटी दर 10 ते 20 टक्क्यांदरम्यान असेल व व्यापलेल्या ऑक्सिजन बेडची टक्केवारी 60 टक्क्यांपेक्षा जास्त असेल.

पाचवा स्तर – ज्या ठिकाणी पॉझिटिव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षी जास्त असेल व व्यापलेल्या ऑक्सिजन बेडची टक्केवारी 75 टक्के या दरम्यान असेल.

वेगवेगळ्या जिल्ह्यांना विविध प्रशासकीय घटकांमध्ये विभाजित करण्यात आले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, वसई-विरार, नवी मुंबई, नागपूर, सोलापूर, कल्याण-डोंबिवली या महानगरपालिकांना वेगळे प्रशासकीय घटक म्हणून गणले जाईल. दुसरीकडे राज्यभरात विविध वर्गात सामील होणाऱ्या क्षेत्रांकरिता पात स्तर तयार करण्यात आले आहे. या स्तरांची अंमलबजावणी त्या ठिकाणच्या साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर आणि रुग्णांनी भरलेले ऑक्सिजन बेडच्या दैनंदिन टक्केवारीवर अवलंबून असेल.

तिसऱ्या स्तरानुसार…

-आवश्यक वस्तूंची दुकान आणि आस्थापना दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत

– आवश्यक नसलेल्या वस्तूंची दुकाने किंवा आस्थापने आठवडाभर सकाळी 7 ते 4 वाजपेर्यत.

– मॉल, चित्रपटगृह मात्र बंदच

-उपहारगृह क्षमतेच्या 50 टक्के सुरू राहणार. सायंकाळी 4 वाजेपर्यंत परवानगी. त्यानंतर केवळ पार्सल आणि होम डिलिव्हरी.

-लोकल ट्रेन वैद्यकीय, अत्यावश्यक, महिला यांच्यासाठी सुरू, डीएम ए अतिरिक्त निर्बंध लागू करू शकतात.

-सार्वजनिक ठिकाणं, पटांगण, वॉकिंग, सायकलिंग – दररोज सकाळी 5 ते 9 पर्यत

-खासगी कार्यालयं सायंकाळी 4 वाजपर्यंत परवानगी, अपवादात्मक श्रेणी वगळून

-शासकीय कार्यालयासह खासगीमध्ये 50 टक्के उपस्थित राहण्यास परवानगी

-क्रीडा – आऊटडोर सकाळी 5 ते 9 आणि सायंकाळी 6 ते 9

-सामाजिक सांस्कृतिक आणि मनोरंजन कार्यक्रमात क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती, शनिवार, रविवारी मनाई

-लग्न समारंभात 50 लोकांना परवानगी

-अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी

-बैठका, निवडणूका, स्थानिक प्रशासन स्थायी समिती बैठक, सहकारी मंडळ क्षमतेच्या 50 टक्के.


Published by:
Meenal Gangurde


First published:
June 5, 2021, 8:24 PM IST





[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here