Home पुणे पुण्यात तृतीयपंथीयाचा भररस्त्यात तमाशा; महिलेला मारहाण करत फाडले कपडे | Crime

पुण्यात तृतीयपंथीयाचा भररस्त्यात तमाशा; महिलेला मारहाण करत फाडले कपडे | Crime

0
पुण्यात तृतीयपंथीयाचा भररस्त्यात तमाशा; महिलेला मारहाण करत फाडले कपडे | Crime

[ad_1]

पुण्यात तृतीयपंथीयाचा भररस्त्यात तमाशा; महिलेला मारहाण करत फाडले कपडे

Crime in Pune: पुणे शहरातील उत्तमनगर (Uttamnagar) परिसरात तृतीयपंथीयानं (Third gender) एका महिलेला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण (Beat) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुणे, 04 जुलै: पुणे (Pune) शहरातील उत्तमनगर (Uttamnagar) परिसरात तृतीयपंथीयानं (Third gender) एका महिलेला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण (Beat) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तृतीयपंथीयानं महिलेचे भररस्त्यात कपडे फाडून (Tear clothes) तिच्याशी गैरवर्तन केलं आहे. त्याबरोबर पीडित महिलेच्या पर्समधील काही पैसे हिसकावून पोबारा केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

दिवसाढवळ्या तृतीयपंथीयानं 40 वर्षीय महिलेला मारहाण केल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना शनिवारी सकाळी सातच्या सुमारास घडली आहे. दरम्यान फिर्यादी महिला उत्तमनगर परिसरातील एका भाजी विक्रीच्या दुकानासमोर बसल्या होत्या. तेव्हा त्याठिकाणी एक तृतीयपंथी व्यक्ती आला. त्यानं महिलेच्या पर्समधून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा-हसत्या खेळत्या कुटुंबाला लागली नजर; एकाच साडीनं गळफास घेत दोन बहिणींची आत्महत्या

त्यामुळे फिर्यादी महिला आणि आरोपी तृतीयपंथी यांच्यात बाचाबाची झाली. यामुळे संतापलेल्या तृतीयपंथीयानं महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान घटनास्थळापासून जाणाऱ्या अन्य एका महिलेनं मध्यस्थी करून भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तृतीयपंथी व्यक्तीनं एका महिलेचा राग दुसऱ्या महिलेवर काढला. मध्यस्थी करणाऱ्या महिलेलाही मारहाण करत आरोपीनं त्यांचे भररस्त्यात कपडे फाडले.

हेही वाचा-प्रेयसीला पळवलं एकानं अन् खून दुसऱ्याचा; 2 वर्षांनी तरुणाच्या हत्येचं गूढ उलगडलं

त्याचबरोबर त्याच्याजवळी 250 रुपये घेऊन पोबारा केला. याप्रकरणी पीडित महिलेनं उत्तमनगर पोलिसांत धाव घेऊन अज्ञात तृतीयपंथीयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे करत आहेत.


Published by:
News18 Desk


First published:
July 4, 2021, 4:40 PM IST



[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here