Home पुणे पुण्यात नवले पुलाजवळ विचित्र अपघात, भरधाव ट्रकने 8 वाहनांना दिली धडक, एकाचा मृत्यू | Pune

पुण्यात नवले पुलाजवळ विचित्र अपघात, भरधाव ट्रकने 8 वाहनांना दिली धडक, एकाचा मृत्यू | Pune

0

[ad_1]

पुण्यात नवले पुलाजवळ विचित्र अपघात, भरधाव ट्रकने 8 वाहनांना दिली धडक, एकाचा मृत्यू

या विचित्र अपघातात एकूण आठ वाहनांचे नुकसान झाले आहे.

पुणे, 10 जुलै : पुण्यात (pune) ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने वडगाव बुद्रूकच्या नवले पुलानजीक (pune navale bridge accident) हायवेवर विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडे सात ते 8 वाजेच्या सुमारास नवले पुलाजवळ हा विचित्र अपघात घडला. मुंबई बंगळुरू महामार्गावर एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या वाहनांना धडक दिली. या विचित्र अपघातात एकूण आठ वाहनांचे नुकसान झाले आहे.

साताऱ्याच्या दिशेकडून मुंबईच्या दिशेने कोबी (भाजीपाला) घेऊन निघालेला माल ट्रक ( क्रमांक: डी डी 01 सी 0467) आज सकाळी नवले पुल व वडगांव पुल येथील हॉटेल विश्वास समोर आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर पुढे असणाऱ्या 4 चारचाकी वाहने आणि 4 रिक्षांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात रिक्षांचा चक्काचूर झाला तर कारचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात  एकाचा मृत्यू झाला असून तीनजण जखमी झाले आहेत.

रिक्षाने ट्रकला ओव्हरटेक केला अन् नवविवाहित शीतल बाहेर फेकली गेली आणि…

जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या ट्रकच्या धडकीत या आठही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामुळे मुंबई सातारा हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

‘मला सर नाही, बॉस म्हणायचं;’ VIRAL VIDEO मुळे चर्चेत आले नवे रेल्वेमंत्री

नवले पुलाजवळ याआधी विचित्र अपघात झाले होते. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण जास्त आहे. तीव्र उतारामुळे अनेकदा अवजड वाहनाच्या चालकाचा ताबा सुटून भीषण अपघात या भागात झालेले आहेत. सतत होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक जीव मुठीत घेऊनच रस्त्यावर येत असतात. त्यामुळे देहूरोडपासून दरी पुलापर्यंत या रस्त्यावर रुंदीकरण करणे, बायपास करणे, या सारख्या कामांची मागणी स्थानिक प्रतिनिधी करत आहेत. या भागाच्या खासदार असलेल्या सुप्रिया सुळे या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन राष्ट्रीय रस्ते महामंडळ आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा करत त्यांनी संसदेत हा प्रश्न फेब्रुवारी महिन्यात उपस्थित केला होता.


Published by:
sachin Salve


First published:
July 10, 2021, 2:19 PM IST

Tags:



[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here