Home पुणे पुण्यात लशींचा पुन्हा तुटवडा; आज केवळ सहा ठिकाणी मिळणार Vaccine | Coronavirus-latest-news

पुण्यात लशींचा पुन्हा तुटवडा; आज केवळ सहा ठिकाणी मिळणार Vaccine | Coronavirus-latest-news

0
पुण्यात लशींचा पुन्हा तुटवडा; आज केवळ सहा ठिकाणी मिळणार Vaccine | Coronavirus-latest-news

[ad_1]

पुण्यात लशींचा पुन्हा तुटवडा; आज केवळ सहा ठिकाणी मिळणार Vaccine

पुण्यात लशीचा मोठा तुटवडा असून आज म्हणजेच सोमवारी पुण्यातील केवळ सहा केंद्रावर लस (Vaccination Centers in Pune) मिळणार आहे. पुण्याच्या महापौरांनी (Pune Mayor) याबाबतची माहिती दिली आहे.

पुणे 05 जुलै : गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळाहून देशभरात कोरोनाचा (Coronavirus in India) प्रसार झाला आहे. अशात कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination) वेग वाढवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, देशभरातील अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा (Covid-19 Vaccine Shortage) जाणवत आहे. पुण्यातही लशीचा मोठा तुटवडा असून आज म्हणजेच सोमवारी पुण्यातील केवळ सहा केंद्रावर लस (Vaccination Centers in Pune) मिळणार आहे. पुण्याच्या महापौरांनी (Pune Mayor) याबाबतची माहिती दिली आहे.

पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस; या प्रमुख मुद्द्यांवर गाजणार

पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) हद्दीतील कोणत्याही लसीकरण केंद्रावर आज कोविशिल्ड (Covieshield) लस उपलब्ध नाहीये. तसंच कोव्हॅक्सिनही (Covaxin) केवळ सहाच केंद्रावर उपलब्ध आहे. यातील प्रत्येक केंद्राकडे लसीचे 200 डोस उपलब्ध असल्याची माहिती, पुण्याच्या महापौरांनी दिली आहे. त्यामुळे, पुण्यात आजही लसीकरणाचा वेग मंदावलेलाच दिसणार आहे.

पुण्यात हातात शस्त्र घेऊन फिरणाऱ्या गुंडांची दहशत; काळजाचा थरकाप उडविणारा VIDEO

देशभरातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात तर कोरोनानं अक्षरशः थैमान घातलं आहे. देशानं आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाटांचा सामना केला आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील परिस्थिती अधिक भयंकर झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच या दुसऱ्या लाटेचा तरुणांवरही मोठा परिणाम झाला. अशात आता येत्या काही महिन्यातच देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे, आतापासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजन करणं महत्त्वाचं आहे. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी देशाकडे लसीकरण हे एक मुख्य आणि महत्त्वाचं हत्यार आहे, मात्र अजूनही अनेक राज्यांमध्ये लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाची प्रक्रिया मंदावली असल्याचं चित्र आहे.


Published by:
Kiran Pharate


First published:
July 5, 2021, 7:12 AM IST



[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here