Home पुणे प्रिय ग्राहक, अपना जनता बँकेतून मिळवा लोन, पुणे पोलिसांनी सांगितलं या मेसेजमागचं गौडबंगाल | Crime

प्रिय ग्राहक, अपना जनता बँकेतून मिळवा लोन, पुणे पोलिसांनी सांगितलं या मेसेजमागचं गौडबंगाल | Crime

0

[ad_1]

प्रिय ग्राहक, अपना जनता बँकेतून मिळवा लोन, पुणे पोलिसांनी सांगितलं या मेसेजमागचं गौडबंगाल

Cyber Crime Pune: ‘प्रिय ग्राहक, अपना जनता बँकेतून मिळवा पर्सनल लोन’, अशा आशयाचे मेसेज पाठवून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. या मेसेज मागचं गौडबंगाल पुणे पोलिसांनी उलगडलं आहे.

पुणे, 06 जुलै: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे (Corona pandemic) मागील दीड वर्षांपासून देशात लॉकडाऊन (Lockdown) जारी करण्यात आलं आहे. दरम्यानच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या (Lost jobs) गेल्या आहेत. तर काहींचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. दरम्यानच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये (Cyber Crime) देखील वाढ झाली आहे. सायबर चोरटे वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करत लोकांची लूट करत आहेत. नोकरी किंवा व्यवसाय ठप्प झाल्यानं कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी अनेकजण कर्ज (low interest Loan) घेण्याकडे वळत आहेत. अशा लोकांना कमी व्याजात कर्ज देण्याच आमिष  (lure) दाखून सायबर चोरटे त्यांची आर्थिक फसवणूक करत आहेत.

त्यामुळे तुम्हालाही कमी व्याजदराने कर्ज देण्याबाबत मेसेज आला असेल तर वेळीच सावधान होण्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे. याबाबतची माहिती पुणे पोलिसांच्या अधिकृत अकाऊंटवरून देण्यात आली आहे. सायबर चोरटे अपना जनता बॅंक, मुद्रा फायनान्स, जनलक्ष्मी फायनान्स येथील कर्मचारी असल्याचा दावा करून लोकांची फसवणूक करत आहेत. तत्पूर्वी सायबर चोरटे ग्राहकांना मोबाइलवर मेसेज पाठवून 2 टक्के व्याजदरानं कर्ज उपलब्ध करून देण्याचं आमिष दाखवतात. त्याचबरोबर कर्ज घ्यायचं असेल तर संपर्क साधण्यासाठी त्यांनी एक मोबाइल क्रमांक देखील दिला आहे.

अशात कमी व्याजात कर्ज मिळतंय म्हणून अनेकजण सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. यानंतर आरोपींकडून बनावट कर्ज मंजुरीचं पत्र शेअर केलं जात आणि जीएसटी टॅक्स आणि प्रक्रिया शुल्क अशी विविध कारणं देत ग्राहकांची लूट केली जात आहे. त्यामुळे असा मेजेस तुम्हालाही आला असेल तर, त्याकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन पुणे पोलिसांकडून केलं आहे.

हेही वाचा- Online Fraud मध्ये बँकेतून 10 लाख रुपये झाले गायब; व्यावसायिकाने दाखविलेल्या हुशारीमुळे सर्व रक्कम क्रेडिट

तुम्हाला पैशाची कितीही गरज असली तरी, अशाप्रकारे ऑनलाइन लोन घेण्यासाठी कोणत्याही स्वरुपात पैसे भरू नका. तसेच कर्जाच्या नावाखाली फसवणूक होत, असल्याचा कसलाही संशय आल्यास त्वरित सायबर सेलकडे तक्रार दाखल करा, असं आवाहन पुणे पोलिसांकडून केलं आहे.


Published by:
News18 Desk


First published:
July 6, 2021, 10:50 AM IST



[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here