पुणे, 18 जून : पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेला लोणावळ्यातील भुशी डॅम (Bhushi dam) ओवरफ्लो झाला आहे. त्यामुळं सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस प्रशासनाकडून धरणारकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. पर्यटन बंदीच्या आदेशामुळे पर्यटकांना पर्यटन स्थळावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळं पर्यटकांनी या भागात जाण्याचे टाळावे.
लोणावळ्यातील पर्यटन स्थळावर पर्यटक आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या पर्यटकांवर गुन्हे दाखल करण्याचा लोणावळा शहर पोलिसांनी इशारा दिला आहे.
संपूर्ण पुणे घाटामध्ये (Pune heavy rain) आज सायंकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सर्वत्र रस्त्यांवर पाणी साचलं आहे. रस्त्यावर मुसळधार पावसामुळं ठराविक अंतराच्या पुढील काही दिसत नाही, त्यामुळे वाहन चालकांनी खूप काळजी घ्यावी. रस्त्यावर गर्दी करू नये, वाहने नियंत्रित वेगात चालवावीत, असे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी सांगितले आहे. होसाळीकर यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली.
8.30 pm,18Jun,
Entire Pune ghat🏞 area is raining since evening with heavy to very heavy spells of rains🌧🌧
IMD forecasted same.
Roads r wet & very poor visibility. So 🚙drivers on road MUST control speed of thier vehicles & take full care.🚦
PL DO NOT RUSH. LITTLE LATE IS OK.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 18, 2021
उत्तरेकडे मॉन्सूनने कूच केल्यानंतर राज्यातील (Maharashtra Rain) बहुतांशी भागात बदल होत आहे. कोकणातील पावसाचा प्रभाव कमी होणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता कमी आहे. दरम्यान विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी आज मेघगर्नजेसह जोरदार (Heavy Rainfall)पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सध्या मध्य महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ वातावरण आहे. तर कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मराठवाड्यात पावसाची उघडीप असून तापमानात काहीशी वाढ झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फुटांवर गेली असून जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणातून 1100 क्यूसेक विसर्ग सुरु आहे. चंदगड- गडहिंग्लज राज्य महामार्गावर भडगावजवळ पाणी साचलं आहे. गेल्या 12 तासात तीन फुटांनी पाणी पातळी वाढली आहे. नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.