[ad_1]
‘या राजकारण्यांना कुणाशी काहीही घेणं देणं नाही. नुसते भांडणे सुरू आहेत. कुणाला काय त्रास होतोय, हे यांना काय माहिती…’
पुणे, 04 जुलै : ‘माझ्या मुलाने परीक्षा दिली होती, त्याची मुलाखत होत नव्हती त्यामुळे त्याने हे पाऊल उचलले. माझा तळतळाट आहे की, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी, तेव्हा या सरकारला कळेल मुलगा जाण्याचे दु:ख काय असते’ असं म्हणत स्वप्नील लोणकरच्या (swapnil lonkar) आईने आक्रोश केला आहे.
MPSC ची परीक्षा दोन वर्षांपूर्वी पास केली मात्र अजूनही नोकरी न लागल्यामुळे पुण्यातील स्वप्नील सुनील लोणकर (वय 24) या विद्यार्थ्याने फुरसुंगी इथे राहत्या घरी त्यानं आत्महत्या केली आहे. स्वप्नीलचे वडील हे प्रिंटिंगचा व्यवसाय करतात. स्वप्नील हा सिव्हिल इंजिनिअर (Civil engineer) होता आणि त्यानं मोठ्या जिद्दीनं MPSC ची परीक्षा दिली होती आणि उत्तीर्णही झाला होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्याला नोकरी मिळाली नव्हतो. यामुळे तो नैराश्यात गेला होता. त्याच्या आत्महत्येमुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
गर्भवती महिलांनी घरातली ‘ही’ कामं करूच नयेत; वाढतील Complications
स्वप्नीलबद्दल बोलत असताना त्याच्या आईला अश्रू अनावर झाले. आज माझ्या मुलाच्या जागी एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या केली असती तर मंत्र्याला जाग आली असती का? माझा मुलगा हुशार होता. त्याने चांगले शिक्षण घेतलं होतं. माझा तळतळाट आहे की, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी मग यांना कळेल. मुलाच्या जाण्याचे दु: ख काय असते. यांनी दुसऱ्यांच्या मुलांचाही विचार करावा, त्यांच्यावर काय परिस्थिती ओढावली असेल हे कळेल, असं म्हणत स्वप्नीलच्या आईने अश्रूना वाट मोकळी करून दिली.
सिझनल फ्लू, खोकल्यापासून तुमच्या चिमुरड्यांना कसं ठेवाल सुरक्षित? घरगुती 6 उपाय
‘या राजकारण्यांना कुणाशी काहीही घेणं देणं नाही. नुसते भांडणे सुरू आहेत. कुणाला काय त्रास होतोय, हे यांना काय माहिती, त्यांना फक्त राजकारणाचं पडलंय. माझा स्वप्नील मला म्हणायला, आई मुलाखत झाली नाही. परीक्षा पास झालोय पण दोन वर्ष झाली. खूप झुरला माझा लेक, पण यांची लेकरं सुरक्षित आहे, म्हणून यांना गरिबांशी काहीही घेणं-देणं नाही. लोकांच्या वेदना यांना कळणार नाही, असा आक्रोश स्वप्निलच्या आईने व्यक्त केला.
‘एमपीएससी मायाजाल आहे यामध्ये पडू नका’
आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्निलनं सुसाईड नोट लिहिली होती. मी घाबरलो, खचलो मुळीच नाही.फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता, एमपीएससी मायाजाल आहे यामध्ये पडू नका, असं त्यानं आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
[ad_2]
Source link