Home पुणे राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट, पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती मात्र चिंताजनक | Coronavirus-latest-news

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट, पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती मात्र चिंताजनक | Coronavirus-latest-news

0
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट, पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती मात्र चिंताजनक | Coronavirus-latest-news

[ad_1]

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट, पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती मात्र चिंताजनक

आज राज्यात एकूण 14,152 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 289 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे सध्या राज्यातील मृत्यूदर 1.7 टक्के एवढा झाला आहे.

मुंबई, 04 जून : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतील (Coronavirus 2nd wave) रुग्णसंख्या आता सातत्याने कमी होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलेनेत मृत्यू होणाऱ्यांची संख्या आजही जास्त आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येतही रोज घट नोंदवली जात आहे. आज 20,852 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 55,07,058  इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.86 टक्के एवढे झाले असल्याने दिलासादायक स्थिती आहे.

आज राज्यात एकूण 14,152 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 289 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे सध्या राज्यातील मृत्यूदर 1.7 टक्के एवढा झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,60,31,395 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58,05,565 (16.11टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 14,75,476 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 7,430 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये आजही स्थिती गंभीर आहे. सध्या राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या या तीन जिल्ह्यांमध्ये आढळत आहे. दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असताना या जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या कमी होती. मात्र, मुंबई, पणेसारख्या शहरांमधील रुग्णसंख्या कमी होत जात असताना या जिल्ह्यांमध्ये वाढू लागली होती. सध्या सापडत असलेली रुग्णसंख्या काहीशी कमी झाली असली तरी या जिल्ह्यांमधील ग्रामीण भागात जास्त रुग्ण सापडू लागले असल्याने चिंता व्यक्त होत आहे. आज सातारा जिल्ह्यात 1537, कोल्हापूर जिल्ह्यात 1159 आणि शहरात 392 असे एकूण 1251 रुग्ण सापडले आहेत. तर सांगली जिल्ह्यात 911 रुग्ण आज सापडले आहेत.

दरम्यान, पुणे शहराचा कोरोनाच्या रुग्णांचा रिकव्हरी रेट हा शुक्रवारी 97.15 टक्क्यांवर पोहोचल्याचं समोर आलं आहे. राज्यातच नव्हे तर देशात हा सर्वाधिक रिकव्हरी रेट आहे. परिणामी रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग हा 899 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. पुण्यानं केलेल्या उपययोजनांमध्ये लसीकरणाचा मोठा वाटा होता. पुण्यात लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी मोठे प्रयत्न झाले. त्यामुळंदेखिल परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आलं आतापर्यंत पुण्यात 11 लाख 22 हजार 811 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

हे वाचा – लसीकरण आपल्या दारी, ग्रामपंचायतीतच लस मिळत असल्याने पायपीट थांबली, गर्दीही टळली

पुणे शहरामधली रुग्णसंख्या घटल्यानं कंटेन्मेंट झोनमध्येदेखिल मोठी घट झाली आहे. शहरात फक्त 28 कंटेन्मेंट झोन असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळं पुण्यातली संपूर्ण राज्याच्या चिंता वाढवलेल्या पुण्यानं कोरोनावर मात करण्याच्या शर्यतीतही आघाडी घेतली आहे. आता सर्व पुणेकरांनी काळजी घेऊन ही स्थिती कायम ठेवणं गरजेचं आहे.


Published by:
News18 Desk


First published:
June 4, 2021, 8:58 PM IST





[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here