Home पुणे ”राज्य सहकारी बॅंकेच्या माध्यमातून दरोडा टाकायचा, जरंडेश्वर हे हिमनगाचे टोक”, चंद्रकांत पाटील यांची अजित पवारांवर टीका | Pune

”राज्य सहकारी बॅंकेच्या माध्यमातून दरोडा टाकायचा, जरंडेश्वर हे हिमनगाचे टोक”, चंद्रकांत पाटील यांची अजित पवारांवर टीका | Pune

0
”राज्य सहकारी बॅंकेच्या माध्यमातून दरोडा टाकायचा, जरंडेश्वर हे हिमनगाचे टोक”, चंद्रकांत पाटील यांची अजित पवारांवर टीका | Pune

[ad_1]

''राज्य सहकारी बॅंकेच्या माध्यमातून दरोडा टाकायचा, जरंडेश्वर हे हिमनगाचे टोक'', चंद्रकांत पाटील यांची अजित पवारांवर टीका

Chandrakant Patil: जरंडेश्वर साखर (jarandeshwar sugar factory ) कारखान्यावर ईडीनं केलेल्या कारवाईवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे, 02 जुलै: राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy CM) अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर (jarandeshwar sugar factory ) कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीनं (ED) हा साखर कारखाना जप्त केला. हा साखर कारखाना अजित पवार यांच्या जवळच्या निकटवर्तीयांचा आहे. त्यामुळे ईडीनं केलेल्या कारवाईमुळे थेट अजित पवार यांना धक्का असल्याचं बोललं जात आहे. ईडीनं केलेल्या कारवाईवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ज्यांनी चूक केली ते सुटणार नाहीत. राज्य सहकारी बॅंकेच्या माध्यमातून दरोडा टाकायचा. जरंडेश्वर हे हिमनगाचे टोक. अजून मोठी यादी आहे, असं चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे.

मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिणार आहे. मराठा समाजामधे संभ्रमाचे वातावरण आहे. मराठा समाजातील 20 ते 25 अभ्यासकांची समिती नेमा आणि हिंमत असेल तर दूध का दूध और पाणी का पाणी होऊ द्या, असंही चंद्रकात पाटील म्हणालेत.

हेही वाचा- ईडीच्या कारवाईवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सविस्तर प्रतिक्रिया

राज्य सरकारने आरक्षण देण्यासाठी पहिले चार टप्पे पार पाडायला हवेत. पहिली जबाबदारी त्या राज्याच्या मागास आयोगाची. ओबीसी आरक्षण परत मिळालं पाहिजे. राज्य मागासवर्ग आयोगाने ओबीसींचा इम्पिरिकल डाटा गोळा महिन्याभरात गोळा करून द्यावा, त्यासाठी राज्य सरकारने पाहिजे ती यंत्रणा आयोगाला पुरवावी, असं चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला सांगितलं आहे.

विधानसभा अध्यक्षपदावरुन चंद्रकांत पाटील यांनी सरकारला टोला लगावला आहे. अधिवेशनाबाबत मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे. त्यांनी सांगावे की विधानसभा अध्यक्ष मिळणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.


Published by:
Pooja Vichare


First published:
July 2, 2021, 3:27 PM IST



[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here