Home पुणे विद्येचं माहेरघर बनतंय क्राइम सिटी? पुण्यात 6 महिन्यात टोळी युद्धांमध्ये 38 जणांचा खेळ खल्लास | Crime

विद्येचं माहेरघर बनतंय क्राइम सिटी? पुण्यात 6 महिन्यात टोळी युद्धांमध्ये 38 जणांचा खेळ खल्लास | Crime

0

[ad_1]

विद्येचं माहेरघर बनतंय क्राइम सिटी? पुण्यात 6 महिन्यात टोळी युद्धांमध्ये 38 जणांचा खेळ खल्लास

मागील सहा महिन्यात पुण्यात एकूण 139 हत्येचे प्रयत्न झाले आहेत. तर 38 जणांची निर्घृण हत्या (Brutal murder) करण्यात आली आहे.

पुणे, 29 जून: मागील काही दिवसांपासून पुण्यासह देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (Corona pandemic) लॉकडाऊन (Lockdown) जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांना आपापल्या घरातचं बसावं लागत आहे. अशा स्थितीत देशातील गुन्हेगारी (Crime) कमी होण्याची अपेक्षा होती. पण पुण्यात गुन्हेगारी वाढल्याचं (Crime increased) चित्र आहे. मागील सहा महिन्यात पुण्यात एकूण 139 हत्येचे प्रयत्न झाले आहेत. तर 38 जणांची निर्घृण हत्या (Brutal murder) करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्व घटना पूर्ववैमनस्यातून घडल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे.

इतके दिवस महाराष्ट्रात क्राइम सिटी म्हणून नागपूर शहर बदनाम होतं. पण मागील काही दिवसांपासून पुण्यातही गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. 2021 वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात पुण्यात एकूण 139 हत्येच्या प्रयत्नांचे गुन्हे दाखल करण्यात आली आहे. गेल्यावर्षी हाच आकडा केवळ 44 इतका होता. म्हणजे यावर्षी पुण्यातील टोळीयुद्धांच्या घटनांत तब्बल 95 टक्के इतकी वाढ झाली आहे. तर मागील सहा महिन्यांत टोळी युद्धातून तब्बल 38 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. 2020 मध्ये हा आकडा 36 इतका होता.

पुणे पोलिसांची कारवाई

मागील पाच महिन्यांत पुणे पोलिसांनी तब्बल 30 गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई केली आहे. बऱ्याच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांना तडीपार देखील करण्यात आलं आहे. मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पुण्यात एकूण 530 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. गेल्यावर्षी हाच आकडा 410 इतका होता. त्यामुळे पुणे शहरात लॉकडाऊन जारी केलं असतानाही गुन्हेगार मोकाट असल्याचं चित्र दिसत आहे.

हेही वाचा-पुण्यात सेक्सटॉर्शनच्या प्रकरणांत वाढ; सोशल मीडियातून 275 पुरुषांना लाखोंचा गंडा

पुण्याच्या ग्रामीण भागासह शहरी भागातंही टोळी युद्धाची प्रकरणं वाढली आहेत. पुण्यातील येरवडा, वानवडी, सिंहगड रोड, बिबवेवाडी, कोंढवा, हडपसर, भवानी पेठ या परिसरात दोन गटांत एकमेकांवर जीवघेणे हल्ले केल्याच्या अनेक तक्रारी नोंदवल्या गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या सर्व घटना एकमेकांकडे बघितल्याच्या रागातून किंवा अपमान केल्याच्या भावनेतून घडल्या असल्याचं क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.


Published by:
News18 Desk


First published:
June 29, 2021, 5:23 PM IST



[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here