[ad_1]
यंदा लॉकडाऊनमुळे बाजार भाव मिळाला नाही. त्यामुळे काढणीस आलेल्या दीड एकर केळी बागेचे नुकसान झाले.
जुन्नर, 21 जून: कोरोना (Corona) आणि लॉकडाऊनचा (Lockdown) मोठा फटका फळ उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यात केळी उत्पादक शेतकऱ्यांचे (banana farming) मोठे नुकसान झाले आहे. केळीला बाजार भाव मिळत नसल्याने पिकात शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी सोडण्याची वेळ आली आहे.
गतवर्षी अतिवृष्टीने झोपलेला शेतकरी यंदा कोरोनाने धास्तावले आहेत. त्यामुळे भाजीपाला उत्पादक आणि फळ उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. वाहतुकीची अडचण बाजारपेठ न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. बाजारपेठेत उठाव नसल्याने व्यापाऱ्यांनी फळ उत्पादक शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. सध्या केळीची बाजारपेठ प्रचंड खालावलेली आहे. यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे.
जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथील राजाराम सहादु भुजबळ यांचा शेती हा पूर्णवेळ व्यवसाय आहे. वडगाव आनंद शिवारात त्यांची शेती आहे. गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने त्यांनी दीड एकर क्षेत्रावर केळीची 3 हजार रोपे लावली होती. मात्र, अतिवृष्टीने संपूर्ण बागेचे नुकसान झाले होते. यंदा लॉकडाऊनमुळे बाजार भाव मिळाला नाही. त्यामुळे काढणीस आलेल्या दीड एकर केळी बागेचे नुकसान झाले.
WTC Final 2021: अश्विन आऊट होताच पत्नी प्रीती निराश, प्रतिक्रिया VIRAL
भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च निघत नाही मात्र तोडणी वाहतूक खर्च करावा लागतो. त्यामुळे त्यांनी शेळ्या-मेंढ्यांना हे पीक खाण्यासाठी उपलब्ध करून दिले. त्यांच्या बागेतला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Tags:
[ad_2]
Source link