Home महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सिंहगडावर जाण्याचा प्लॅन करताय? मग हे वाचाच; अन्यथा भरावा लागेल आर्थिक भुर्दंड | Pune

सिंहगडावर जाण्याचा प्लॅन करताय? मग हे वाचाच; अन्यथा भरावा लागेल आर्थिक भुर्दंड | Pune

0
सिंहगडावर जाण्याचा प्लॅन करताय? मग हे वाचाच; अन्यथा भरावा लागेल आर्थिक भुर्दंड | Pune

पुणे, 19 जून: मागील काही दिवसांपासून पुण्यात (Pune) कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट (Corona cases decrease) होताना दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनानं लॉकडाऊनचे अनेक कडक निर्बंध शिथिल (Unlock) केले आहेत. त्याचबरोबर राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे अनेक नागरिक निसर्गरम्य वातावरणात सहलीसाठी बाहेर पडत आहेत. पण शासनानं निर्बंध शिथिल केले असले तरी अद्याप पर्यटन स्थळे (Tourist Places) बंदच ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे नियम डावलून सिंहगडावर (Sinhagad Fort) जाण्याचा विचार करत असाल तर, आर्थिक दंडासोबतच गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात रविवारी पर्यटकांनी सिंहगडावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे हवेली पोलिसांनी कारवाईचा बडगा उगरला आहे. दर शनिवार, रविवारी आणि इतर दिवशी खडकवासला धरण, पानशेत, सिंहगड किल्ला परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यंटकांना प्रत्येकी 500 रुपये दंड आकरण्यात येणार आहे. शिवाय कोरोना नियम डावलून पर्यटनास येणाऱ्या नागरिकांवर आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कायदेशीर गुन्हाही दाखल केला जाईल, असा इशारा हवेली पोलिसांकडून देण्यात आला आहे.

त्यामुळे नियम डावलून सिंहगडावर जाण्याचा प्लॅन करत असाल कर तुम्हाला आर्थिक भुर्दंडासोबतचं तुरुंगावारी देखील करावी लागेल. त्यामुळे सिंहगडावर पर्यटनासाठी जाण्याचं शक्यतो टाळाच असा सल्ला पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार, सिंहगड किल्ला आणि आजुबाजूची पर्यटन स्थळे अद्याप पर्यटकांसाठी खुली करण्यात आली नाहीत. असं असूनही बरेच नागरिक खडकवासला धरण, पानशेत, सिंहगड किल्ला परिसरात फिरण्यासाठी गर्दी करत आहेत.

पुढील दोन ते तीन महिन्यात कोरोना विषाणूची तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नगरिकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. असं असूनही नागरिकांकडून कोरोना नियम पायदळी तुडवले जात आहेत. त्यामुळे वीकेंडला सिंहगडावर जाण्याचा प्लॅन करत असाल, तर दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे हवेली पोलिसांकडून नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here