पुणे, 19 जून: सारथी (Sarathi) संस्थेच्या कामकाजासंदर्भात आज पुण्यात (Pune) महत्त्वाची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar), खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje) आणि मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) राज्य समन्वयक तसेच सारथी संस्था संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते. ही बैठक पार पडल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी म्हटलं, सारथीसाठी 1000 कोटी रुपये देण्याचा शब्द देण्यात आला आहे.
बैठकीत चांगली चर्चा झाली, सगळे मुद्दे मान्य झाले, गांभीर्याने काम सुरू झालं आहे. सगळ्याच गोष्टी तातडीने होणार नाहीत. 20 ते 21 दिवस लागतील अस सांगितल आहे. हॉस्टेल, तारादूत या सगळ्या प्रश्नावर भूमिका मांडल्या असल्याचंही संभाजीराजे यांनी बैठकीनंतर सांगितलं.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) संस्थेचे सबलीकरण आणि उपक्रम विस्तार करून त्याला 1000 कोटींचा निधी देण्याची मागणी करण्यात आली. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी मंजूर केल्याचा शब्द दिला असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.