Home पुणे Coronavirus in Pune: पुण्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत अचानक वाढ, विविध चर्चांना उधाण | Coronavirus-latest-news

Coronavirus in Pune: पुण्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत अचानक वाढ, विविध चर्चांना उधाण | Coronavirus-latest-news

0

[ad_1]

Coronavirus: पुण्यात कोरोनाची तिसरी लाट? रुग्णसंख्येत अचानक मोठी वाढ

Coronavirus in Pune: पुण्यात आज अचानक कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.

पुणे, 7 जुलै : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोरोना बाधितांच्या (Coronavirus in Pune) संख्येत घसरण होत असल्याचं पहायला मिळत होतं. तसेच कोरोनामुक्त संख्येत दिवसेंदिवस वाढ होत होती. मात्र, आज अचानक पुण्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज पुण्यात तब्बल 432 नवीन कोरोना बाधितांची नोंद (432 new cases reported in Pune today) झाली आहे. बाधितांचा आकडा अचानक दुप्पट झाल्याने पुण्यात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

आज पुण्यात एकूण 432 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 271 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज पुण्यात एकूण 14 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पुण्याच्या बाहेरील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 2871 सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 252 रुग्णांची स्थिती गंभीर आहे.

लशीचे दोन डोस घेतल्यानंतर मृत्युचा धोका 95 टक्के कमी; ICMRच्या अभ्यासातील निष्कर्ष

पुण्यात आतापर्यंत एकूण 480582 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 469083 जणांनी कोरोनावर मात केली. तर 8628 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जुलै महिन्यातील पुण्यातील रुग्णसंख्या

7 जुलै – 432 नवीन रुग्णांचे निदान

6 जुलै – 268 नवीन रुग्णांचे निदान

5 जुलै – 150 नवीन रुग्णांचे निदान

4 जुलै – 316 नवीन रुग्णांचे निदान

3 जुलै – 344 नवीन रुग्णांचे निदान

2 जुलै – 269 नवीन रुग्णांचे निदान

1 जुलै – 286 नवीन रुग्णांचे निदान


Published by:
Sunil Desale


First published:
July 7, 2021, 7:10 PM IST



[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here