पुणे, 07 जून : (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन
एकिकडे कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) वेग कमी होत असताना दुसरीकडे ब्लॅक फंगसचा (Black fungus) वेग वाढतो आहे. या रुग्णांची संख्या वाढते आहे. कोरोनामुक्त रुग्णांना ही समस्या बळावत असल्याने चिंता वाढली आहे. या आजारावरील उपचारही (Black fungus treatment) खूप महाग आहे. पण ब्लॅक फंगसवर अगदी स्वस्तात उपचार करण्याचा मार्ग पुण्याच्या डॉक्टरने शोधला आहे.
ब्लॅक फंगसवरील उपचाराचा खर्च दिवसाला कमीत कमी 35000 रुपये आहे. पण हा खर्च 350 रुपयांपर्यंत करता येऊ शकतो. पुण्याच्या डॉक्टरांनी 100 पट स्वस्त असा ब्लॅक फंगसवर उपचार सांगितला आहे.
ब्लॅक फंगसवर अँम्फोटेरिसीन (amphotericin injections) हे औषध प्रभावी आहे. सध्या ब्लॅक फंगसवर उपचारासाठी वापरलं जात असलेलं लिपोझोमल अँम्फोटेरिसीन औषध खूप महाग आहे. पण अगदी यासारखंच असलेलं कन्व्हेंशनल अँम्फोटेरेसीन हे यापेक्षा शंभरपट स्वस्त आहे. पण यासाठी योग्य देखरेख करण्याची गरज आहे.