[ad_1]
Maharashtra Unlock: येत्या सोमवारपासून म्हणजेच 7 जूनपासून महाराष्ट्र पाच स्तरांमध्ये अनलॉक होणार आहे. लॉकडाऊन काळात राज्य सरकारनं अंत्यविधीसाठी काही निर्बंध घातले होते.
मुंबई, 05 जूनः येत्या सोमवारपासून म्हणजेच 7 जूनपासून महाराष्ट्र पाच स्तरांमध्ये अनलॉक होणार आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra Unlock) अनलॉकबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आलेत. त्यानुसार त्या त्या जिल्ह्यांमध्ये अनलॉक होईल.
अनलॉक करत असताना 5 स्तर तयार करण्यात आले आहेत. या अधिसूचनेनुसार पहिल्या टप्प्यात येणारे जिल्हे आणि शहरांमध्ये कमीतकमी निर्बंधित असतील, तर तर पाचव्या टप्प्यातील निर्बंध अधिक कडक असतील. यावेळी राज्य सरकारनं अंत्यविधीसाठी काही निर्बंध शिथिल केले आहेत.
अंत्यविधीसाठी पहिल्या दोन स्तरात कोणतीही बंधनं घातली नाहीत. अंत्यविधीची निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तिसऱ्या चौथ्या टप्प्यात 20 जणांच्या उपस्थिती बंधनकारक असणार आहेत. पाचव्या टप्प्यात निर्बंध कायम असतील.
हेही वाचा- कसं आहे ‘पाच’ टप्प्यातील महाराष्ट्र अनलॉकचं वर्गीकरण, वाचा सविस्तर
हे आहेत पाच स्तरातील जिल्हे
पहिला स्तर: अहमदनगर, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, ठाणे, वर्धा
दुसरा स्तर: औरंगाबाद, गडचिरोली, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदूरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी,
तिसरा स्तरः अकोला, अमरावती, बीड, पुणे, वाशिम, यवतमाळ
चौथा स्तर: रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग,
पाचवा स्तर: कोल्हापूर
हेही वाचा- संभाजीराजे छत्रपती यांचं नवं ट्वीट; शेअर केला ‘हा’ ऐतिहासिक फोटो
[ad_2]
Source link