Home पुणे मराठवाडा मुक्ती दिन म्हणजे भारताच्या एकात्मतेचा उत्सव !!

मराठवाडा मुक्ती दिन म्हणजे भारताच्या एकात्मतेचा उत्सव !!

0
मराठवाडा मुक्ती दिन म्हणजे भारताच्या एकात्मतेचा उत्सव !!

पुणे (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

मराठवाडा मुक्ती दीन हा भारताच्या एकात्मतेचा उत्सव असल्याने संबंध भारतीयांनी मराठवाडा मुक्ती दीन साजरा केला पाहिजे असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक सतीश पाटील यांनी केले मराठवाडा प्रेमी मित्र मंडळ आयोजित युवा वर्गासाठी विचारांचा जागर या कार्यक्रमात ते बोलत होते या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल कदम हे होते त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब किसवे हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून लेखक उद्योजक शरद तांदळे , माजी कृषी संचालक सुरेश अंबुलगेकर ,मेजर शिवराज कल्याणकर ,लेखक डॉ प्रकाश कोयाडे हे होते .
आपले विचार व्यक्त करताना पाटील यांनी सांगितले की आपले हक्क आणि कर्तव्य यासाठी सजग राहून जे काही क्षेत्र निवडाल त्याचा लाँग टर्म प्लॅन करूनच तयारी करा
माजी कृषी संचालक सुरेश अमुलगेकर यांनी शेतीची कल्पना बदलली पाहिजे आधुनिक शेती मध्ये व्हॉर्तीकल शेती होरिझोंटल शेती मत्स्य शेती गोट फार्मिंग यांसारख्या नवीन शेती तंत्र अवगत केली पाहिजेत
डॉ शिवराज कल्याणकर यांनी भारतीय सेनेतील मराठवाड्याचा सहभाग व मातीची असलेली ओढ व त्यातून निर्माण होणारे आपलेपण सांगितले
लेखक डॉ प्रकाश कोयाडे यांनी मराठवाड्यातील साहित्यिकांची वैचारिक साहित्य चळवळ होणे काळाची गरज असल्याचे सांगितले.

प्रमुख पाहुणे बाळासाहेब कीसवे यांनी मराठवाड्यातील अनुशेष सप्रमाण दाखवून दिला त्याची आकडेवारी सादर केली मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे गरज व इतिहास सांगून श्रोत्यांना आपल्या ओघवात्या वक्तृत्व शैलीने मंत्रमुग्ध केले मराठवाडयातील ७६ तालुक्यांमध्ये ही चळवळ राबवावी लागणार आहे असे प्रतिपादन बाळासाहेब कीसवे यांनी केले.

लेखक उद्योजक शरद तांदळे यांनी जुन्या रझाकारांच्या अन्यायी राजवटीची आठवण करून देऊन आजही रझाकार गेलेले नाहीत त्यांचं रूप बदललंय आपणच ते पोसले त येणारी तीन वर्षे आपण कठोर मेहनत केली तर सुखाचा काळ दिसेल असे इस्त्राईल देशाचे उदाहरण देऊन सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल कदम यांनी येणाऱ्या काळात मराठवाड्याला हक्काचा न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ राबवावी लागणार आहे असे सांगितले
कार्यक्रमाचे संयोजन विशाल हुंबे यांनी केले तर सूत्रसंचालन दीपक कसबे यांनी केले आभार प्रदर्शन अतुल पाटील यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here