पुणे, 22 जून : कोरोनापासून (Coronavirus) बचाव करण्यासाठी मास्क (Mask) वापरणं गरजेचं आहे. मात्र या मास्कमुळे मूकबधिरांच्या (Deaf, Mute citizens) आयुष्यात गेल्या दीड वर्षांपासून एक वेगळीच समस्या निर्माण झालीय. त्यांची भाषा सांकेतिक असल्यामुळे मास्क लावल्यानंतर त्यांना एकमेकांशी संवाद साधण्यात (Communication Issue due to mask) अडचणी येत आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी पुण्यातील कार्यकर्त्या अॅड. रमा सरोदे (Pune’s petitioner Rama Sarode) यांनी उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली होती. त्यांच्या या प्रयत्नाला अखेर यश आलं आहे.
मूकबधिरांसाठी पारदर्शक पॅच असणारे विशेष मास्क (Special masks with transparent patch) तयार करायला कोविड टास्क फोर्सनं (Covid Task Force) मान्यता दिली आहे. उच्च न्यायालयानंतर आदेश दिल्यानंतर आता मूकबधिरांसाठी खास प्रकारचे मास्क बनवण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला असला तरी अद्याप असे मास्क बनवण्यासाठी कुणीही पुढे आलेलं नाही.
दीड वर्षे खुंटला संवाद