पुणे, 17 जून : पुण्यातील (Pune city) सासवडमध्ये दोन दिवसांपूर्वी एका महिलेची आणि तिच्या मुलाची निर्घृण हत्या (Crime in Pune) करण्यात आली होती. या दोघांचेही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले होते. तेव्हापासूनच या महिलेचा पती आबिद गायब आहे असं पोलिसांकडून (Pune police) सांगण्यात आलं होतं. तर महिला आलिया आणि तिचा लहान मुलगा अयान यांच्या मृतदेहांना पोलिसांनी शवविच्छेदनासाठी (Postmortem) पाठवलं होतं. आता या दोघांचाही शवविच्छेदनाचा अहवाल (Postmortem report) समोर आला आहे. पोलिसांच्या तब्बल सात टीम्सकडून आबिदचा शोध घेण्यात येतोय.
या प्रकरणात हत्या करण्यात आलेल्या माय-लेकाच्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब समोर आली आहे. आलिया (Alia and Ayan sheikh death case) हिला बेदम मारहाण करून तिची हत्या करण्यात आली आहे. तर चिमुकल्या अयानचा गळा दाबून त्याची हत्या करण्यात आलीये. त्यामुळे पोलिसांच्या संशयाची सुई ही पूर्णपणे महिलेचा पती आबिदवर आहे. घटनेच्या दिवसापासूनच आबिद गायब आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी लूक आउट नोटीसही जारी केला आहे.