Home पुणे Pune Crime: गोट्याला ओळखतो का? विचारत टोळक्याचा दोघांवर प्राणघातक हल्ला; एकाचे आतडे आले बाहेर | Crime

Pune Crime: गोट्याला ओळखतो का? विचारत टोळक्याचा दोघांवर प्राणघातक हल्ला; एकाचे आतडे आले बाहेर | Crime

0
Pune Crime: गोट्याला ओळखतो का? विचारत टोळक्याचा दोघांवर प्राणघातक हल्ला; एकाचे आतडे आले बाहेर | Crime

[ad_1]

Pune Crime: गोट्याला ओळखतो का? विचारत टोळक्याचा दोघांवर प्राणघातक हल्ला; एकाचे आतडे आले बाहेर

पुण्यातील हडपसर परिसरात एका टोळक्यानं दोन मित्रांवर प्राणघातक हल्ला (Gang attack on two friends) केला आहे. हा हल्ला इतका भयंकर होता की, यामध्ये एकाचे तरुणाचे आतडे बाहेर आले आहेत.

पुणे, 30 जून: मागील काही दिवसांपासून पुण्याता टोळीयुद्धाची (Gangwar) प्रकरणं वाढताना दिसत आहेत. मागील अवघ्या सहा महिन्यात एकूण 139 जणांवर प्राणघातक हल्ला (Attack) झाला आहे. तर 38 जणांची निर्घृण हत्या (38 Brural murder) करण्यात आली आहे. शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराची आता ओळख क्राइम सिटीत (Crime city) बदलत असताना दिसत आहे. काल रात्री पुन्हा एका टोळक्यानं दोघांवर प्राणघातक हल्ला (Gang attack on two friends) केला आहे. पाच ते सहा जणांच्या टोळक्यानं किरकोळ कारणातून हा हल्ला केला आहे. पण हा हल्ला इतका भयंकर होता की, यामध्ये एकाचे आतडे बाहेर आले आहेत.

या हल्ल्यानंतर दोघांना रात्री उशीरा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संतोष महादेव गायकवाड आणि त्याचा मित्र खेडकर असं हल्ला झालेल्या तरुणांची नावं आहेत. संबंधित दोघं तरुण सोमवारी रात्री अकराच्या सुमारास मद्यप्राशन करण्यासाठी हडपसर परिसरातील रायकर वस्ती परिसरात गेले होते. दरम्यान त्याठिकाणी पाच ते सहा जणांचा एक टोळका आला.

हेही वाचा-दहिसरमध्ये दिवसाढवळ्या गोळ्या झाडून ज्वेलर्स मालकाची हत्या

पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, टोळक्यातील एका आरोपीनं फिर्यादी संतोषला मी प्रकाश गायकवाड उर्फ गोट्या याचा मित्र आहे, असा परिचय दिला. आणि तू गोट्याला ओळखतो का? असं विचारलं. यावेळी संतोषनं गोट्या माझ्या परिचयाचा असून, तो भावासारखा असल्याचं सांगितलं. यानंतर आरोपींनी गोट्याला फोन लाव म्हणत फिर्यादीला दमदाटी केली. यावेळी फिर्यादी संतोषला आरोपींच्या हातात कोयते असल्याचे दिसले. त्यामुळे त्यानं फोन न करता दुचाकीवर बसून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी त्याच्या पाठीत कोयत्यानं सपासप वार केले. पण फिर्यादी संतोष आपला जीव मुठीत घेऊन तेथून कसाबसा पळाला.

हेही वाचा-विद्येचं माहेरघर बनतंय क्राइम सिटी? पुण्यात 6 महिन्यात गँगवॉरमधून 38 जणांचा खून

पण त्याचा मित्र खेडेकर मात्र आरोपींच्या तावडीत गवसला. आरोपींनी फिर्यादी संतोषचा मित्र खेडेकर याच्यावर कोयत्यानं सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की, यामध्ये खेडेकरचे आतडे बाहेर आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री उशीरा घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केलं. ससून रुग्णालयात जखमी तरुणावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.


Published by:
News18 Desk


First published:
June 30, 2021, 5:08 PM IST



[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here