[ad_1]
Pune Doctor couple suicide: डॉक्टर डे (National Doctor’s Day) दिवशीच डॉक्टर दाम्पत्यानं आत्महत्या केली आहे.
पुणे, 01 जुलै: डॉक्टर डे (National Doctor’s Day) दिवशीच डॉक्टर दाम्पत्यानं (Doctor Couple) आत्महत्या (commits suicide) केली आहे. पुण्यातल्या (Pune) वानवडी येथील आझादनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. डॉ. अंकिता शेंडकर आणि डॉ. निखिल शेंडकर अशी मृत डॉक्टर दाम्पत्यांचं नाव आहे.
काल रात्री आधी पत्नीनं गळफास लावून जीवन संपवलं. हाच धक्का न सावरलेल्या डॉक्टर पतीनंही आज आत्महत्या केली आहे, अशी माहिती वानवडी पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा- गुलशन कुमार हत्या प्रकरण: 24 वर्षानंतर High Court चा मोठा निर्णय
26 वर्षीय डॉ. अंकिता शेंडकर यांनी राहत्या घरी पंख्याला ओढणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. तर 28 वर्षीय निखिल शेंडकर यांनीही पत्नीच्या मृत्यूनंतर घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान डॉक्टर पत्नीच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
[ad_2]
Source link